भोकर म्हणजे जिल्हा नाही, खासदार हा जिल्ह्याचा असतो, वसंत चव्हाणांनी मतदारसंघात फिल्डिंग लावताच अशोक चव्हाणांची टीका
Ashok Chavan on Vasant Chavan, Nanded : भोकर मतदारसंघातुन काँग्रेसने (Congress) जनसंवाद यात्रा आज पासून सुरू केली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांनी आता पूर्ण भोकर मतदारसंघात आपले लक्ष घातले आहे.
Ashok Chavan on Vasant Chavan, Nanded : भोकर मतदारसंघातुन काँग्रेसने (Congress) जनसंवाद यात्रा आज पासून सुरू केली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांनी आता पूर्ण भोकर मतदारसंघात आपले लक्ष घातले आहे. भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात आता काँग्रेसची यात्रा निघाली आहे. त्यावरुन अशोक चव्हाण यांनी वसंत चव्हाण यांचावर टीका केलीये. "भोकर म्हणजे जिल्हा नाही खासदार हा जिल्हाच असतो निवडणूक इतर तालुक्यात सुद्धा होणार आहे. त्यांनी तिकडे लक्ष घातल्यामुळे आम्हाला बाकी ठिकाणी मोकळीक मिळालीये", असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.
उमेदवारीबाबत इतक्या लवकर मी सांगू शकत नाही
अशोक चव्हाण यांच्या भाचेसून डॉ मिलन खतगावकर यांनी बंडाचा इशारा दिला होता. नायगाव मतदार संघातून पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी असल्याचं मिनल खतगावकर म्हणाल्या होत्या. त्यांच्या भूमिकेबाबत खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचं वरिष्ठ पातळीवर कदाचित बोलणं चालू आहे , इतक्या लवकर मी सांगू शकत नाही. उमेदवारीचा विषय भाजपामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन माहिती घेऊन ठरवला जातो, असं अशोक चव्हाण म्हणाले. अजून कोणाचीही उमेदवारी कुठल्याच जिल्हयातून निश्चित झाली नाही. अनेक लोक प्रयत्नात आहेत , बघुया असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
डी. पी सावंत काँगेस मध्येच होते, त्यांनी काँगेस सोडली नव्हती
भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र डी. पी सावंत यांनी काँगेस कडून नांदेड उत्तर मधून उमेदवारी मागितली आहे. जवळच्या मित्राने साथ सोडली का? असं अशोक चव्हाण यांना विचारलं असता, डी. पी सावंत काँगेस मध्येच होते, त्यांनी काँगेस सोडली नव्हती. त्यामूळे त्यांनी उमेदवारी मागितली त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असं अशोक चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या सोबत भाजपात गेलेले अनेक शिलेदारांनी पुन्हा काँगेस मध्ये प्रवेश केला. स्थानिक परिस्तिथीनुसार लोकं निर्णय घेतात असं अशोक चव्हाण म्हणाले. पक्ष सोडून माझ्या सोबत या असा आग्रह मी कोणालाच केला नाही. ज्यांना वाटलं ते आले माझ्या सोबत , ज्यांना वाटलं नाही ते राहिले, असं अशोक चव्हाण म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या