Ashok Chavan on Majha Katta : बऱ्याच वर्षांनी नारायण राणेंचा फोन आला, धाडसी माणूस आहे; 'माझा कट्ट्या'वर अशोक चव्हणांनी सांगितला किस्सा
Ashok Chavan on Majha Katta : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काल बऱ्याच वर्षांनी नारायण राणेंचा फोन आला. तुमच स्वागत आणि अभिनंदन असे फोनवर म्हणाले. माझे आणि नारायण राणेंचे (Narayan Rane) चांगले संबंध आहेत. काल फोन आल्यावर मला बर वाटलं.
Ashok Chavan on Majha Katta : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काल बऱ्याच वर्षांनी नारायण राणेंचा फोन आला. तुमच स्वागत आणि अभिनंदन असे फोनवर म्हणाले. माझे आणि नारायण राणेंचे (Narayan Rane) चांगले संबंध आहेत. काल फोन आल्यावर मला बर वाटलं. आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत, धाडसी माणूस आहे, असे भाजप नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले आहेत. ते 'माझा कट्ट्या'वर बोलत होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काय घडलं. पक्षाबाबत काय समजलं असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे.
भाजपमध्ये काम करण्याची वेगळी पद्धत आहे
अशोक चव्हाण म्हणाले, भाजपमध्ये काम करण्याची वेगळी पद्धत आहे, अशी माझी जनरल फिलिंग आहे. ज्या जबाबदाऱ्या पक्ष सोपवेल, ते करु आपण. मला माझ्या सहकाऱ्याने नारायण राणेंबाबतचा एक विचित्र योगायोग सांगितला. तो म्हणाल, तुम्ही आले की ते जातात. त्याला म्हटलं कृपया तुम्ही अस काही सांगू नका. माझे आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि होते. त्यांचा स्वभाव वेगळाय. नारायण राणे माझ्यावर कधी रागवायचे. नाराजही व्हायचे. ते चालत होत. माझी काही हरकत नव्हती. त्यांचा फोन आला तेव्हा फोन कशासाठी आला म्हणून घाबरुन गेलो होतो.
राज्यसभेत मोदींचे कौतुक करणार की सोनिया गांधीवर टीका?
पुढे बोलताना, अशोक चव्हाण म्हणाले, मी वस्तूनिष्ट भूमिका घेणार आहे. काही लोकांच्या अपेक्षा होत्या की, मी गेल्याबरोबर काँग्रेस नेत्यांना शिवा घालायला सुरु कराव्यात. मी म्हटलं अजिबात नाही. ज्यांच्याबरोबर मी गेली 40 ते 50 वर्षे राहिलो. नेतृत्वही मान्य केलं. गांधी कुटुंबानी मला राजकीय आशीर्वाद दिला. त्यांना मी 48 तासांत शिव्या घालायला सुरुवात करेन का? म्हटलं हे जमणार नाही मला. लोक नक्कीच म्हणतील की, एबीपीमध्ये 10 वर्षापूर्वी काय बोलले आणि आता काय बोलले. याची तुलना होणार मला कल्पना आहे. त्यामुळे मी त्यावेळेस असं काही बोललेलो नाही. पीएम मोदींबाबतही काही बोललो नाही आणि सोनिया गांधी यांच्याबाबतही काही बोललेलो नाही. ते माझ्या स्वभावातच नाही. तुम्ही तुमची कामगिरी दाखवा. लहानचं मोठं ज्यांनी केलं त्यांना शिव्या द्या , हे माझ्या स्वभावात नाही, असे चव्हाण यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या