Vasant Chavan on Ashok Chavan : भाजपमध्ये जाताच अशोक चव्हाण कामाला लागले, काँग्रेसच्याच उमेदवाराला गळाला लावण्याचा प्लॅन, फोनवरुन संभाषण
Vasant Chavan on Ashok Chavan, Nanded : भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी फोन करुन भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट नांदेड लोकसभेचे काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी केलाय.
Vasant Chavan on Ashok Chavan, Nanded : भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी फोन करुन भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट नांदेड लोकसभेचे काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी केलाय. भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मी स्वीच केलंय, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नव्या भूमिकेत चव्हाणांनी चोख कामगिरी बजावण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी आज मरळक येथे प्रचाराचा नारळ फोडत सभा घेतली. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांनी मला भाजपात येणाची ऑफर दिल्याचा दावा केला.
चव्हाण मला म्हणाले तुम्ही अभिनंदनही करु नाही राहिले
वसंत चव्हाण काय म्हणाले, मला अशोकराव साहेबांनी दिल्लीहून फोन लावला. ते हैदराबादला गेले. सकाळीच मला पत्ता लागला. कारण माझ्या गावावरुनच जावं लागतं. संध्याकाळी फोन केला. चव्हाण मला म्हणाले तुम्ही अभिनंदनही करु नाही राहिले. मी म्हणालो काय म्हणून अभिनंदन करु तुमचे. नांदेडला आल्यावर बोलूयात म्हणालो. आम्हाला तिथे त्यांनी सांगितले की, भाजपमध्ये या. मी म्हणालो तुम्ही साधलं ठीक आहे. आम्हाला ते जमणार नाही. या जिल्ह्याची काँग्रेस कमिटी आम्ही सर्वजण मिळून हातात घेऊ. उद्या जनता दरबार याचा फैसला करेल.
तेव्हा माझ्या वडिलांनी राजीनामा दिला
1974 ला या जिल्ह्याचे सुपूत्र शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांनी माझ्या वडिलांना बोलावून घेतलं. म्हणाले, महाराष्ट्रात माझी इज्जत चालली. त्यांनी बोलावून माझ्या वडिलांचा राजीनामा घेतला. त्यावेळी पद्मश्रींचे पाठराखण आमच्या पाठिशी होतं. म्हणाले माझं महाराष्ट्रात नाक कापायलंय. तेव्हा माझ्या वडिलांनी राजीनामा दिला. कोणाच्या दारात आम्ही भीक मागायला गेलो नाही. मी शेतकरी कुटुंबातील माणूस आहे. माझ्याकडे कोणताही कारखाना नाही.
माझ्या संस्थेत आज 6 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात
वडिलांनी काढलेली शिक्षणसंस्था आहे. आजही आम्ही सांगतो की, शिक्षणसंस्था वाढवली. तिथे अनेक युनिट आहेत. माझ्या संस्थेत आज 6 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. आम्ही कोणताही धंदा केला नाही. कोणता कारखाना काढला नाही. वडिलोपार्जित जमीन आहे. वडिलांनी कारखान्याचा काढण्याचा प्रयत्न केला होता. पण चव्हाण साहेबांना ते बघवलं नाही. म्हणाले खतगावकर माझा जावई आहे. ते पर्वाचा इंजिनिअर झालाय. त्याला चेअरमन करायचे. झालं जावई चेअरमन झाले. आम्ही मोकळे झालो.
इतर महत्वाच्या बातम्या