एक्स्प्लोर

Dahi Handi : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर आशिष शेलारांचं लक्ष्य, वरळीत भाजपकडून दहीहंडीचं आयोजन

Dahi Handi : आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी या मतदारसंघात भाजपने भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे वरळीत शिवसेनेचे तीन आमदार असतानाही आता दहीहंडीसाठी त्यांना दुसरं मैदान शोधावं लागत आहे.

Dahi Handi : आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई भाजप (BJP) अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि थेट शिवसेना (Shiv Sena) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मतदारसंघाकडे लक्ष वळवलं आहे. माजी पर्यटन आणि पर्यावरण आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी (Worli) या मतदारसंघात भाजपने भव्य दहीहंडी (Dahi Handi 2022) सोहळ्याचं आयोजन केलं आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे. विशेष म्हणजे वरळीत शिवसेनेचे तीन आमदार असतानाही आता दहीहंडीसाठी त्यांना दुसरं मैदान शोधावं लागत आहे. त्यामुळे दहीहंडीवरुन वरळीत राजकीय काला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे आमदार, नगरसेवक असतानाही भाजपची बाजी
आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलं आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच (19 ऑगस्ट) वरळीच्या जांबोरी मैदाना हा दहीहंडी सोहळा होणार आहे. वरळीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आणि अनेक नगरसेवक असतानाही दहीहंडी सोहळ्याच्या आयोजनात भाजपने बाजी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता दहीहंडी उत्सवासाठी शिवसेनेकडून पर्यायी मैदान शोधलं जात आहे.

आदित्य ठाकरेंचा राज्यभरातील शिवसैनिकांसोबत संवाद
शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे गट वेगळा झाला. पक्षातील तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांच्यासमोर पक्ष वाचवण्याचं आणि पक्षबांधणीचं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करुन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. 

आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघाकडे मोर्चा
तर दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपची जबाबदारी दिली. त्या दृष्टीने आशिष शेलार तयारी लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून की काय त्यांनी आपला मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाकडे वळवला आहे. आदित्य यांच्या मतदारसंघात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करुन मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांचा इरादा आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget