ज्या 83 वर्षांच्या बापानं मोठं केलं, ज्यांच्या जीवावर सत्तेची फळं चाखलीत, त्याला हुकूमशाह म्हणताय : अनिल देशमुख
Maharashtra Politics: हिंमत असेल स्वत:चा पक्ष काढून निवडणुका लढवा, माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांचं अजित पवार गटाला थेट आव्हान
Anil Deshmukh on Ajit Pawar Group : राष्ट्रवादी (NCP) शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अजित पवार गटावर (Ajit Pawar Group) सडकून टीका केली आहे. ज्यांच्या जीवावर सत्तेची फळं चाखलीत, त्याच बापाला हुकूमशाह म्हणत आहात, थोडी तरी लाज बाळगा, असं म्हणत अनिल देशमुखांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. तसेच, हिंमत असेल स्वत:चा पक्ष काढून निवडणुका लढवा, असं आव्हानही अनिल देशमुखांनी अजित पवार गटाला दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे.
माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, "ज्या 83 वर्षांच्या बापानं तुम्हाला मोठं केलं. त्यांच्याच जीवावर तुम्ही सत्तेची फळ चाखलित. स्वतःची संस्थानं उभी केलीत, आज त्याच बापाला तुम्ही हुकूमशहा म्हणत आहात. थोडी तरी लाज बाळगा." तसेच, "तुमच्यात हिम्मत असेलच तर स्वतःचा पक्ष काढा आणि निवडणुका लढवून बघा, जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.", असंही अनिल देशमुखांनी म्हटलं आहे.
ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठं केलं. त्यांच्याच जीवावर तुम्ही सत्तेची फळ चाखलित. स्वतःची संस्थानं उभी केलीत, आज त्याच बापाला तुम्ही हुकूमशहा म्हणत आहात. थोडी तरी लाज बाळगा!
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 10, 2023
तुमच्यात हिम्मत असेलच तर स्वतःचा पक्ष काढा आणि निवडणुका लढवून बघा, जनता तुम्हाला तुमची जागा…
सध्या राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटानं युक्तिवाद करताना शरद पवार यांनी हुकूमशाही पद्धतीनं पक्ष चालवला, तसेच, परस्पर पत्र काढून ते नियुक्त्या करत होते, असा आरोप केला होता. तर शरद पवार गटानं पक्षाचं चिन्ह गोठवू नये, अशी मागणी आयोगाकडे केली होती. या सुनावणीत शरद पवारांचा उल्लेख हुकूमशाह केल्यावरुन शरद पवार गटानं अजित पवार गटावर जोरदार प्रहार केला आहे. तसेच, अनेकांनी अजित पवार गटावर टिकास्त्रही डागली आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील जनतेनं पुन्हा एकदा अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला. अजित पवारांनी उचललेल्या पावलानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) दोन गटांत विभागली गेली. एक राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गट आणि दुसरा अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा गट. त्यामुळे शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडानंतर अनुभवलेल्या सर्व गोष्टी महाराष्ट्र पुन्हा अनुभवतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :