मोठी बातमी : अमित ठाकरेंनी शड्डू ठोकला, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार का? स्पष्टच सांगितलं
Amit Thackeray on Vidhansabha Election : आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? याबाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
Amit Thackeray on Vidhansabha Election, पंढरपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (दि.22) आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांचे तोंडभरुन कौतुक केले. "संदीप देशपांडे हे राजकीय दृष्ट्या जागृत आहे. आपल्या भागाबद्दल जागृत आहे. विषयावर बोलणारा मुलगा आहे. काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो आणि होणार नसेल तर नाही म्हणून सांगतो", असं म्हणत संदीप देशपांडे यांच्या पाठीवर शाबासकी दिली पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी वरळीतील सभेतून केलं. दरम्यान, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे असल्याने त्यांच्याविरोधात अमित ठाकरे यांनाही उतरवलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरु होती. याबाबत आता अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.
अमित ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीमधून निवडणूक लढवणार का?
मी कुठून ही आणि कोणाबरोबर ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास तयार आहे. वरळी हा विषय आमच्या पक्षाच्या बैठकीतील विषय होता. तो कसा बाहेर आला मला माहित नाही. माझा पक्ष जेथे लढण्यास सांगेन आणि आणि ज्याच्या विरोधात लढण्यास सांगेन, तेथून मी लढण्यास तयार आहे. शिवाय पक्षाला जेथे माझी गरज असेल तेथून मी विधानसभा लढविण्यास तयार , असल्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अमित ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आदित्य ठाकरेंविरोधातही मैदानात उतरु शकतात, याची शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य ठाकरे 2019 मध्ये पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यांनंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही देण्यात आले होते. दरम्यान, आता राज ठाकरे आदित्य ठाकरेंविरोधात अमित ठाकरेंना उमेदवारी देणार की, निष्ठावंत असलेल्या संदीप देशपांडेंना मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राज ठाकरेंची मनसे उमेदवार जाहीर करण्यात आघाडीवर
राज ठाकरे यांची मनसे उमेदवारी जाहीर करण्यात आघाडीवर आहे. राज ठाकरेंनी विदर्भ , मराठवाडा आणि सोलापूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सात उमेदवार जाहीर केले आहेत. शिवाय, त्यांनी स्वबळावर लढणार असल्याचीही घोषणा केली आहे.
मनसेच्या उमेदवारांची यादी
1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. वणी - राजू उंबरकर
इतर महत्वाच्या बातम्या