एक्स्प्लोर

'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक कधी येणार? जातीनिहाय जनगणनेवरही बोलले अमित शाह

Amit Shah : वन नेशन वन इलेक्शनबाबतचे विधेयक सभागृहात कधी मांडले जाणार ? याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलं.

Amit Shah, दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेला घेतली. यादरम्यान अमित शहा यांना वन नेशन-वन इलेक्शनवर प्रश्न विचारण्यात आला. या सरकारच्या कार्यकाळातच वन नेशन-वन इलेक्शन विधेयक आणले जाईल, असे  अमित शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले , भारतीय जनता पक्षाच्या  नेतृत्वाखालील एनडीए सरकार सध्याच्या कार्यकाळात वन नेशन-वन इलेक्शन लागू करेन. 'या सरकारच्या कार्यकाळातच 'एक राष्ट्र, एक निवडणूक' ही प्रणाली लागू करण्याची आमची योजना आहे. 

गेल्या महिन्यात, स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी 'एक राष्ट्र, एक निवडणूक'चा जोरदार पुरस्कार केला होता.  वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीला अडथळा ठरत असल्याचे म्हटले होते. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, 'एक देश, एक निवडणूक'साठी देशाला पुढे यावे लागेल. 'एक राष्ट्र, एक निवडणूक' हे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्यात दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी एक आहे.

जात जनगणनेवर काय म्हटले होते?

जात जनगणनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, जनगणनेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. पुढील 15 दिवस पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा केला जाईल. सेवा पंधरवाडा म्हणजे गरजू लोकांची सेवा करणे. ते म्हणाले की, ही पत्रकार परिषद तिसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांवर आहे. आम्हाला तिसऱ्यांदा जनादेश मिळाला आहे. 10 वर्षे विकासाची दारं कायम ठेवल्यानंतर 11व्या वर्षात पोहोचली आहे. देशाची व्यवस्था प्रत्येक प्रकारे मजबूत झाली आहे. शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल झाला आहे. अनेक देशांना नवीन शैक्षणिक धोरण, मेड इन इंडिया, डिजिटल इंडिया या योजना स्वीकारायच्या आहेत.

अमित शहा म्हणाले, 'अंतराळातील भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. परराष्ट्र धोरणात पाठीचा कणा दिसून आला आहे. मोदी सरकारने 10 वर्षात वीज, पाणी, अन्नधान्य, घरे दिली. अमृतकाळाची वेळ आली आहे, लोक भारताच्या विकासाच्या प्रवासात भागीदार झाले आहेत. तिसऱ्या आदेशाचे 100 दिवस संपत आहेत, देशात 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मोदी 3.0 मध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. वाराणसी, बागडोगरा, बिहार आणि दोन विमानतळांवर नवीन हवाई पट्टी बांधण्यात आली आहे.  बंगळुरूमधील मेट्रो, किसान सन्मान निधीचा 21 वा हप्ता, खरेदी केलेल्या पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यूपीए सरकारकडून अनेक पटींनी जास्त एमएसपी खरेदी करण्यात आली आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयकाचाही उल्लेख 

वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत अमित शाह म्हणाले, येत्या काही दिवसांत ते संसदेत मंजूर केले जाईल. 1 जुलैपासून अमलात आलेले तीन नवीन कायदे फौजदारी न्याय व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बळकटी देणार आहेत. दोन वर्षांत संपूर्ण देशात याची अंमलबजावणी केली जाईल. संविधान हत्या दिनानिमित्त देशातील जनतेला जाणीव होईल. पंतप्रधानांच्या रशिया-युक्रेन दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष मोदींवर लागून आहे. रेल्वे अपघात हे षडयंत्र असेल तर ते फार काळ टिकणार नाही, असे सांगून अमित शहा रेल्वे अपघातांवर म्हणाले, सीबीआय एनआयए रेल्वे पोलीस रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठी संयुक्तपणे रणनीती बनवत आहेत, असंही अमित शाहांनी स्पष्ट केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Supriya Sule and Rashmi Thackeray '...तर सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे मुख्यमंत्रि‍पदाच्या दावेदार असू शकतात', काँग्रेस खासदाराचं रोखठोक वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Embed widget