Ambadas Danve: धनंजय मुंडेंचं खातं वाल्मिक कराडचं चालवत होते, अंबादास दानवे कडाडले, 'राजीनामा घ्या अन्यथा..
सरकार खून करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभं राहित. धंनजय मुंडे वृत्तीमुळे सरकारची प्रतिमा बदनाम होत असल्याने मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे असंही अंबादास दानवे म्हणाले.

Ambadas Danve: राज्याचे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे खाते प्रत्यक्षात वाल्मिक कराड चालवत होते, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. धनंजय मुंडेंचं खातं वाल्मिक कराडच चालवत होते. जे प्रस्ताव देण्यात आले त्याला मुख्यमंत्री यांनीही सहमती दिली. त्यामुळे यात सरकार देखील सहभागी आहे का असा सवाल उपस्थित होतोय. एक कॅबिनेट मंत्री असा कारभार करत असताना मुख्यमंत्री यांच्या लक्षात येत नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, सरकारने धंनजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे,अन्यथा अधिवेशन पुढे जाणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिलाय. (Resignation)
काय म्हणाले अंबादास दानवे?
तीन लाखाचे काम मजूर होण्यासाठी चार महिने लागतात, पण या प्रकरणात DBT बाजूला करण्यात आली.सरकारची फसवणूक मंत्री आणि या विभागाने केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
पीक विमा घोटाळा बाहेर आला, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा घोटाळा झाला, यात कुणाचा तरी आशीर्वाद आहे.हा सर्व ठरवून केलेला प्रकार आहे. जनता आणि आम्ही विरोधी पक्ष देखील जबाब विचारणार आहोत. ही राज्याची फसवणूक आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यानंतर राजीनामा घ्यावा असं अंबादास दानवे म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे काय चुकीचं बोलले म्हणत धंनजय मुंडे पाठीमागे उभा राहिल्याने कराडने हे केले.वाल्मिक कराड धनंजय मुंडेंची सावली आहे. असंही ते म्हणाले. (Walmik Karad)
धनंजय मुंडे आणि कराड यांची ईडी चौकशी केली पाहिजे...
'सरकार खून करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभं राहित,भ्रष्टाचार करणाऱ्याना पाठीशी घालणारे सरकार आहे. धंनजय मुंडे वृत्तीमुळे सरकारची प्रतिमा बदनाम होत असल्याने मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे असंही अंबादास दानवे म्हणाले.अंजली दमानिया यांनी काही गोष्टी समोर आणल्या, त्यावेळी देखील समोर आल्या, पण धंनजय मुंडे यांच्या दबावाखाली अधिकारी काम करू शकले नाहीत. वाल्मिक कराडच हे खातं चालवत होते. जे प्रस्ताव देण्यात आले त्याला मुख्यमंत्री यांनी सहमती दिली. त्यामुळे यात सरकार देखील सहभागी आहे का असा प्रश्न उपस्थित होतेा. असंही ते म्हणाले. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरूनही अंबादास दानवेंनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने लाडकी बहिणी योजनाखाली निवडणुकीत लाच दिली होती. निवडणूक संपल्यावर यांना अटी शर्ती आठवत आहे. संजय गांधी सारख्या योजनांचा लाभ घेणाऱ्याना देखील लाभ मिळणार नाही' असंही ते म्हणाले.
हेही वाचा





















