एक्स्प्लोर

Video: मी थोड्या दिवसाचा पाहुणा, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक भाषण; नारायण गडावर डोळ्यातून अश्रू

विराट संख्येनं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय.. असे म्हणत जरांगे पाटील यांनी नारायण गडावरुन आपल्या भाषणाला सुरुवात केली.

बीड : विजयादशमी दसऱ्याचा आजचा दिवस विविध ठिकाणच्या दसरा मेळाव्यांनी (Dasara melava) गाजत असून सारवगाव येथे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडेंनी जातीवादावर प्रहार करत भाषण जागवले. त्यानंतर, नारायण गडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj jarange) यांनीही मराठा समाजाला उद्देशून भाषण केलं. तत्पूर्वी नारायण गडावर जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी, त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळल्याचं दिसून आलं. जरांगे पाटील रुग्णालयातून या दसरा मेळाव्यासाठी खास नारायण गडावर (Beed) आले होते. त्यामुळे, आजारपणातच त्यांनी जोरकसपणे भाषण केले.

विराट संख्येनं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय.. असे म्हणत जरांगे पाटील यांनी नारायण गडावरुन आपल्या भाषणाला सुरुवात केली. मायबापहो... मला बोलायला लई त्रास होतोय, आपला गड नगद आहे म्हणून बोलायला ताकद मिळतेय. जशी मला मिळाली, तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळेल. लई वेदना आहेत, शरिराला त्रास आहे. मी 5-6 महिन्यांपूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की, मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी भावनिक भाषण केलं. त्यावेळी, नारायण गडावरील वातावरण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, जरांगे पाटलांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले होते. तरीही, जरांगे पाटील यांनी उपस्थित आणि मराठा समाजाला उद्देशून भाषण केलं.

दसऱ्याच्या निमित्ताने सांगतो, जातीला सांभाळायचं असेल तर तुम्हाला शासक बनावं लागेल आणि प्रशासकही बनावंही लागेल. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनापुढे उभं राहावं लागतं, तुमच्या पोरांना तहसीलदार, PSI, कलेक्टर बनवा. तुमचं पोरगं-पोरगी तहसीलदार, PSI, कलेक्टर बनवा. अधिकारी बनवा. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरु गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईल. सगळे बोगस लोकं जाऊन तिथे बसलेत, बोगस आरक्षण घेतलेले बसलेत बोगस, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर जाण्याचं आवाहन केलंय. तसेच, मराठा आरक्षण ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कामाला लागा, प्रमाणपत्र काढून घ्या, असेही पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा

Video: नवरात्री, शायरी अन् जातीपातीचे राक्षस संपवण्याची आवाहन; दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक भाषण

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
Embed widget