एक्स्प्लोर

नुसत्या चर्चाच नव्हे, सुनेत्रा पवार प्रत्यक्षात लोकसभेच्या तयारीला लागल्या?; बारामतीत भेटीगाठी वाढल्या

Baramati Lok Sabha Constituency : सुप्रिया सुळेंविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.

बारामती : मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) अधिकच चर्चेत आला असून, सुप्रिया सुळेंविरोधात (Supriya Sule) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे आता या फक्त चर्चाच नसून प्रत्यक्षात सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha Election) उतरणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्याचं कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांचे बारामती मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. सोबतच त्यांच्याकडून बारामतीत भेटीगाठी घेतल्या जात आहे. आज देखील सुनेत्रा पवार या बारामतीचा (Baramati) दौरा करत आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामतीतील विविध ठिकाणी सुनेत्रा पवार आज विविध विकास कामांचा शुभारंभ आणि गाठीभेटी घेणार आहेत. बारामतीतील सूर्यनगरी परिसरात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन झाले. गेल्या काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचे दौरे वाढले आहेत. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या नावाची चर्चा असतानाच त्यांच्याकडून होणाऱ्या गाठीभेटी पाहता आगामी काळात नणंद-भावजयीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य...

मागील काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या सतत बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहे. दरम्यान, गुरुवारी (22 फेब्रुवारी) अखिल बारामती लोहार समाज श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना त्यांनी एक सूचक वक्तव्य केले आहेत. "मी भिगवणमध्ये पहिल्यांदा आले आहे. प्रचाराच्या निमित्ताने मी कधी भिगवणमध्ये आले नव्हते, पण आता भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील" असं सुनेत्रा पवार म्हणताच एकच हशा पिकला. 

सुप्रिया सुळे देखील बारामतीत...

मागील अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीचा नेतृत्व सुप्रिया सुळे आणि अजित पवारांकडे असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. त्यामुळे मागील महिन्यात पुलाखालून बरेच पाणी गेले आहेत. त्यात आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देखील कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे या देखील बारामतीचा दौरा करत असून, आज देखील त्या बारामती लोकसभा मतदारसंघात असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Sunetra Pawar : बारामतीमध्ये भावनिक साद अन् इंदापूर तालुक्यात ते सूचक वक्तव्य; सुनेत्रा पवारांचा सुद्धा 'राज'कीय सूर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget