एक्स्प्लोर

एकतर माझं कुंकू लावा, नाहीतर त्यांचं तरी; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा

Ajit Pawar Baramati Speech : काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांमध्ये कधी शरद पवारांसोबत तर, कधी अजित पवारांसोबत दिसतात, असं सांगत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे.

बारामती : एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना इशारा (NCP Workers) दिला आहे. काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar Group) या दोन्ही पक्षांमध्ये कधी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) तर, कधी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) दिसतात, असं सांगत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मी असा दावा करणार नाही की 100 टक्के कामे झालं. पण आमच्या हातात ज्यावेळेस सूत्र आली, तेव्हा आम्ही शांत बसलो नाही. मी पुन्हा सांगतो, बाबांनो भावनिक होऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी

काहीजण दादा आले की, दादांच्या पुढे पण हलगी वाजत असतात. फटाके वाजत असतात आणि दादाला दिसेल, असं पुढे चालत असतात आणि दादांची पाठ फिरली आणि दुसरे आले की, त्यांच्याबरोबर असतात, अरे काय चाललंय तुमचं. एकाचे कुंकू लावा माझे तरी, लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, हे काय लावलाय चाटाळपणा, नेमकं काय करायचं ते ठरवा, असं म्हणत अजित पवारांनी दोन्ही पवारांच्या मागे पुढे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. बारामतीत सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ब्रेकिंगला मुद्दा द्यायचा नाही

अजित पवार यांनी यावेळी म्हटलं की, काही झाकून राहत नाही, मी आपल्याला जबाबदारीने सांगतो. त्या निंबोडे गावामध्ये घोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता आणि आपल्या भाषेत बोलायला गेलो, काय तिथं करावं, काय धरणात, या वाक्यामुळे माझे वाटोळे झालं. परत कानाला खडाच लावला कॅमेरा असो-नसो सारखे मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचे शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही, मुद्दा ब्रेकिंगला द्यायचा नाही, असं अजित पवार म्हणाले. 

अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन

माणूस चुकतो जो काम करतो तो चुकतो. मी बोलतो म्हणून शब्द गेला परंतु कायम गेला नाही  त्याकरता माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणे, आता साहेब उभे नाहीत, मी पण उभा नाही, आम्ही दोघेही नाही आणि त्याच्यामुळे आता चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या बारामतीत आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं, हे तुम्ही ठरवा, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे. त्याच्यामध्ये सुनेला मान असतो, लक्ष्मी म्हणून समजतात, कुणाच्याही घरामध्ये सून आली तर सासू  काही दिवसांनी तिच्या हातामध्ये चावा देतात ना आणि सगळे आता तू बघ आणि चुकले तर ती सुनेला सांगते, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

भावनिक होऊ नका

अजित पवार पुढे म्हणाले, आईच्या पोटामधून कोण शिकून येत नाही, मी पण नाही आलो, पहिले 84 ला मी भाषण करायचो माझे पाय लटलट कापायचे. त्या लिंबाकडे बघून भाषण करायचं आणि ते लिंबाकडे माणसं बघायची, तिथे माकड बसले का, काय बसले. जिरायती पट्ट्यात फिरत असताना, रस्ते माहीत नव्हते, ही अवस्था होती माझी, म्हणून माझे सांगणे बाबांनो आज भावनिक होऊ नका, असं आवाहान अजित पवारांनी केलं आहे. दुष्काळ जाहीर केला, बारामतीत आणि वाड्यांना आता पाणी चालू आहे, असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget