एक्स्प्लोर

Ajit Pawar: मला रस नाही, मी सात-आठवेळा आमदार, जय पवारांच्या बारामतीच्या उमेदवारीवर अजित पवारांचं रोखठोक भाष्य

Maharashtra Politics: माझी प्रचंड बदनामी केली जात आहे. मी वेशभुषा बदलून, नाव बदलून दिल्ली जातो, असे सांगितले जाते. माझ्या आईवडिलांनी इतकं चांगलं नाव ठेवलं आहे, ते बदलण्याची गरज काय, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार गटातील पक्षातंर्गत हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी जॅकेटपासून ते त्यांचा लोकांमधील मोकळाढाकळा वावर अशा अनेक गोष्टींची चर्चा सुरु आहे. नुकतीच त्यांनी बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध माझ्या पत्नीला रिंगणात उतरवण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली दिली होती. अजितदादांच्या या कबुलीवरुन सुरु झालेली चर्चा थांबत नाही तोच आता त्यांनी बारामतीच्या राजकारणासंदर्भात आणखी एक सूचक वक्तव्य करुन राजकीय वर्तुळाची उत्कंठा वाढवली आहे. 

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) रिंगणात उतरतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत अजित पवार यांनी गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले. बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार निवडणूक लढवणार आहेत का, असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे. मला रस नाही. मी सात-आठ निवडणुका केल्यात. त्यांच्यासंदर्भात (जय पवार) जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेतली. जनता, कार्यकर्ते आणि पार्लामेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी जय पवार बारामतीमधून लढण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळलेली नाही. अन्यथा अजितदादा एरवी रोखठोक उत्तर देऊन मोकळे होतात. पण अजितदादांनी बारामती विधानसभेचा निर्णय जनतेवर सोडून भविष्यातील वेगळ्या राजकारणाचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री आणि माझ्यात वाद नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत एका फाईलवर सही करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याची  माहिती समोर आली होती. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, या बातम्या धादांत खोट्या आहेत. आमच्यात कुठलाही वाद आणि मतभेद नाहीत. आम्ही सगळे एकोप्याने सरकार चालवत आहोत. मी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जळगावला एकत्र जाऊन आलो. विरोधकांकडे सध्या टीकेसाठी कोणताही मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असेल तर आम्ही त्यावर काही करु शकत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. 

VIDEO: अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य

आणखी वाचा

रक्षाबंधनाला अजितदादांना राखी बांधणार का? सुप्रिया सुळेंनी एका शब्दात विषय संपवला

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पिसाळलेला श्वान चावला की माणूसही त्या श्वानाप्रमाणे बोलतो, तटकरेंचा रामदास कदमांवर पलटवार, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी त्यांना रुग्णालयात दाखवावं
पिसाळलेला श्वान चावला की माणूसही त्या श्वानाप्रमाणे बोलतो, तटकरेंचा रामदास कदमांवर पलटवार, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी त्यांना रुग्णालयात दाखवावं
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Shivsena : मोठी बातमी! ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांची खासदारकी वाचली, शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी 
मोठी बातमी! ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांची खासदारकी वाचली, शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी 
जो राम का नही, वो किसी काम का नही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले त्यांनी रामरक्षा वाचावी
जो राम का नही, वो किसी काम का नही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले त्यांनी रामरक्षा वाचावी

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget