एक्स्प्लोर

पुरुष असताना घर एक असतं, पण स्त्रियांच्या हट्टाने...अजित पवारांनी वाक्य अपूर्ण ठेवलं पण सगळ्यांना कळायचं ते कळलं!

अजित पवारांच्या बंडामुळे फुटले. इतर राजकीय घराण्यांप्रमाणे घरफुटीचे दुःख पवार घराण्याच्याही वाट्याला आले आहे. मात्र घर का फुटले? यावर अजित पवारांनी भाष्य केले आहे.

 पुणे अजित पवारांनी  वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली.  राज्याच्या राजकारणात पवारांचे मातब्बर घराणे म्हणून ओळखले जाते.  राजकारणात घराण्याच्या तीन ते चार पिढ्या उतरल्या. पण घर अभेद्य होते. मात्र हे घर अजित पवारांच्या बंडामुळे फुटले. इतर राजकीय घराण्यांप्रमाणे घरफुटीचे दुःख पवार घराण्याच्याही वाट्याला आले आहे. तशा थोड्या फार कुरबुरी सगळ्या घरांमध्ये असतात. त्यात  राजकारण म्हटल्यावर तर महत्त्वाकांक्षाही जास्तच असणारच.. त्याच महत्त्वकांक्षेपोटी काका-पुतण्या वैराचा वेढा पवार कुटुंबांला पडला आणि रक्ताची नाती तुटली आहेत.  पहिल्यांदाच अजित पवारांनी (Ajit Pawar)  कुटुंबात पडलेल्या फुटीला कोण जबाबदार आहे यावर भाष्य केले आहे.  

अजित पवार म्हणाले,  सध्या राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले आहेत.   आतापर्यंत तुम्हाला कधी त्रास झाला नाही कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. मात्र आता काय झाले दोन पक्ष झाले आहेत. सध्या दोन्ही बाजूंची पवार मंडळी सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायले लागले... कधी न दिसणारे आता घरी येऊन साड्या द्यायला लागले, स्टीलची घमेले द्यायला लागले, स्टीलचे डबे द्यायला लागले.. एकीने केले की दुसरी लगेच हट्टाला पेटती लगेच ती करते..  ते म्हणतात ना  पुरुष मंडळी आहेत तोपर्यंत घर एक असते, पण एकदा का काही... सध्या नवरात्र आहे. स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे. 

पुन्हा एकदा पवार वि. पवार?

अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्याविरोधात  मैदानात उतरले आहेत. आगामी विधानसभा निडणुकीत पुन्हा एकदा बारामतीत पवार वि. पवार अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण  आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे मैदानात उतरण्याती शक्यता आहे.  युगेंद्र हे अजित पवार यांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत.   युगेंद्र सध्या बारामतीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. जनता दरबार घेत आहेत. सोशल मीडियावर देखील प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. 

अजित पवारांचा  रोख नेमका कुणाकडे?

शरद पवारांचं बोट धरून अजित पवार राजकारणात आले, मात्र आता अजित पवारांनी काकांची साथ सोडली. ज्या शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात तयार केलं, या अजित पवारांनी काकांची साथ सोडली.हे पवार कुटुंबातील अनेकांना रुचले नाही. या संदर्भात श्रीनिवास पवारांनी भूमीका देखील स्पष्ट केली. पुरुष असताना घर एक असतं, पण... त्यानंतर अजित पवारांनी आपले वाक्य अपूर्ण ठेवेले.  अजित पवार हे कायम त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. मात्र यावेळी भाषणात अजित पवारांनी ओठांपर्यंत आलेले शब्द गिळले,  अजित पवारांचा  रोख नेमका कुणाकडे?  असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित होतो. 

Video :  पाहा अजित पवार नेमंक काय म्हणाले? 

हे ही वाचा :

मला कोणालाही दुखवायचं नव्हतं, जे काही केलंय ते पवार साहेबांच्या परवानगीनेच केलंय, अजित पवारांची स्पष्टोक्ती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

National Television Award ABP Majha | नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये ABP माझाचा डंकाNarendra Modi : काँग्रेस कुटुंबानं संविधानाला धक्का दिला इंदिरा गांधींच्या निर्णयांवर मोदींची टीकाOne Nation one election | एक देश एक निवडणूक! घटना दुरुस्तीत तरतुदी काय असतील? Special ReportSpecial Report One Nation One Election : एक देश एक निवडणूक! नव्या तरतुदी काय असतील?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन
दादांच्या राष्ट्रवादीतील पहिलं नाव समोर, नरहरी झिरवाळ यांना सुनील तटकरेंचा शपथविधीसाठी फोन
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
Embed widget