Ajit Pawar on Narendra Modi : युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुतीनला फोन लावला, हे कुण्या येड्या गबाळ्याचं काम नाही, अजित पवारांकडून कौतुकाचा वर्षाव
Ajit Pawar on Narendra Modi, Satara : आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू-फुले-आंबेडकरांचा विचाराचा आहे. मात्र, 2019 मध्ये पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्यास सांगितले.
Ajit Pawar on Narendra Modi, Satara : "आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू-फुले-आंबेडकरांचा विचाराचा आहे. मात्र, 2019 मध्ये पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही एक तक्रार येऊ दिली नाही. मात्र, 10 वर्षाच्या काळात पीएम मोदींवर भ्रष्टाचाराचा एक शितोंडाही उडालेला नाही. पुलवामा झाल्यानंतर मोदींनी (Narendra Modi) असा दणका दिला की, पुन्हा पाकिस्तानने आपल्याकडे बघितलंच नाही. गप गार शांत बसलाय. भारतातील मुलं शिकायला युक्रेनला गेली होती. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरु झालं होतं. पुतीन रशियाचा मेन माणूस आहे. युद्ध सुरु झाल्यावर महाराष्ट्रात आम्हाला फोन येऊ लागले. आमची मुलं तिथं वैद्यकीय शिक्षणासाठी गेली आहेत. त्यानंतर आम्ही पंतप्रधानांशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं काळजी करु नका. मोदीजींनी (Narendra Modi) युक्रेन विरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी पुतीनला फोन लावला. त्यांनी पुतीनला सांगितलं माझी मुलं, मुली आहेत. तेवढ्या काळापुरते युद्ध थांबवा. युद्ध थांबलं. त्यांनी स्पेशल विमानं पाठवून सगळ्यांना सुरक्षित परत आणलं", असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाई येथे सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींचे कौतुक केले. तर काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, असे सांगितले.
सातारा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे
अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे सांगतात हे सर्व सामान्यांचं सरकार आहे. हे तुमचं आमचं सरकार आहे. सातारा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे. अतिशय प्रेमळ असे कार्यकर्ते जिवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत. याचा अनुभव 1999 ते 2004 सालामध्ये घेतला. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये ओळखी झाल्या. वेगवेगळ्या भागामध्ये काय आणलं पाहिजे? कसा निधी दिला पाहिजे? हे आपल्याला चांगलं माहिती आहे. महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला त्याला 64 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब हे किती कर्तबगार नेते आहेत, हे देशाला समजलं, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
मी अनेक चव्हाण साहेबांची पुस्तक वाचली आहेत
आज मी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे. मी अनेक चव्हाण साहेबांची पुस्तक वाचली आहेत. त्यांच्यावरही काही राजकीय संकट आली होती. चढउतार आले. याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहेत. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे की, बहुजन समाजाला मदत करायची असेल तर सरकारमध्ये जाऊनच करावी लागते. मी काही तांम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. मी सत्तेला हपापलेला माणूस नाही. पण चव्हाण साहेबांचा विचार आणि त्यांनी दाखवलेला रस्त्याने पुढे जातोय. आम्ही जाहीरनाम्यात चव्हाण साहेबांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी केली आहे. चव्हाण साहेब यांच्यासोबत किसन वीर यांनी काम केलं होतं. मी त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. आज मकरंद आबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिवस कमी मिळाले आहेत. मात्र, आपल्याला 7 तारखेला उदयनराजेंना मतदान करायचं आहे, असे आवाहनही अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.
स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावर बोफोर्सचा आरोप झाला
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आज मोदी साहेबांना देशात विकास पुरुष ओळखंल जातय. आज एक-एक खासदार त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला गेला पाहिजे. देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले. स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावर बोफोर्सचा आरोप झाला. त्यांनी मला 91 साली तिकीट दिलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघांच दिलं. त्यानंतर एक दु:खद घटना घडली आणि ते आपल्यातून निघून गेले. पण त्यापूर्वी मिस्टर क्लिन अशी त्यांची इमेज होती. तरिही बोफोर्सच्या आरोपामुळे त्यांना सत्ता सोडावी लागली. डॉ. मनमोहन सिंगांवर 2 जी आरोप झाला. ते एवढं फेमस झालं की, विचारायची सोय नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Rahul Gandhi on Maratha Reservation : राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलले! विनोद पाटलांकडून भूमिकेचं स्वागत; नेमकं काय म्हणाले?