एक्स्प्लोर

एकीकडे राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची चर्चा; दुसरीकडे अजित पवारांचे आमदार शरद पवारांना भेटले

अजित पवारांच्या आमदाराने शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रत्नागिरी : राज्यात एकीकडे दोन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमधील दुरावा काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीही वाढताना दिसून येत आहेत. याच आठवड्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार (Sharad pawar) एकत्र आले होते. त्यानंतर, पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप (BJP) सोडून कुठल्याही पक्षासोबत आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांनी शरद पवारांची भेट घेतली. 

अजित पवारांच्या आमदाराने शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, या भेटीदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील शरद कृषी भवनच्या कामकाजाकडे लक्ष देण्याची सूचना शरद पवारांनी निकम यांना केली. तसेच, लवकरच शरद पवार येथील कृषी केंद्राला भेट देणार असल्याचेही समजते. एआय तंत्रज्ञान आधारीत शेतीसाठीच्या सुविधांसाठी कशाप्रकारे काम करता येईल याची माहिती आमदार निकम यांनी शरद पवारांकडून घेतली. 

कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यात AI (Artificial Intelligence) सेंटर स्थापन करण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यासाठी आमदार निकम यांनी शरद पवार यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीच्या निमित्ताने शेखर निकम यांनी पवारांची भेट घेऊन या पुढाकाराचे मनःपूर्वक स्वागत केले. या बैठकीत कृषी उत्पादनवाढ, जलसंपत्ती व्यवस्थापन, हवामानानुसार स्मार्ट शेती, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, यावर विधायक चर्चा झाली. कोकणातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे, हीच या प्रयत्नामागची मुख्य भूमिका असल्याचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.

राष्ट्रवादी आघाडीसोबत अनुकूल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी अनुकूल आहे. त्यात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतही आघाडीसाठी राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, आजच्या भेटीकडेही केवळ औपचारिकता किंवा शेतीविषय भेट म्हणता येणार नाही.

हेही वाचा

अवघ्या 23व्या वर्षी आकाशात झेपावलेली मैथिली पाटील मृत्यूच्या कवेत; कृष्णावर प्रेम अन् भगवत गीतेवर होता विश्वास

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget