एक्स्प्लोर

Manikrao Kokate: जे सूरज चव्हाणांचं झालं तेच माणिकराव कोकाटेंचं होणार, चुकीला माफी नाही! राजीनामा द्यायला टाळाटाळ, आता अजित पवार थेट कार्यक्रम करणार

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांनी आपल्याल रमी खेळताच येत नाही, मी आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही, असा दावा माणिकराव कोकाटे यांनी केला होता. सर्व आरोप फेटाळले.

Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate: अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याकडून कृषी खाते काढून घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याचा कारभार काढून ते वाईचे आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांच्याकडे दिला जाण्याची दाट शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईन रमी (Rummy) खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना नाराजी व्यक्त केली होती. तर अजित पवार या सगळ्यावर मौन बाळगून होते. विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकही नेता माणिकराव कोकाटे यांच्या बचावासाठी मैदानात उतरला नव्हता. तेव्हाच माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होण्याचे संकेत मिळाले होते.

माणिकराव कोकाटे हे काल स्वत:हून आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. परंतु, कोकाटे यांनी कालही नेहमीप्रमाणे 'मीच बरोबर कसा?' हा धोशा लावला होता. हे सगळे पाहता ते स्वत:हून राजीनामा देण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे आता अजित पवार यांनाच स्वत:हून कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे. यापूर्वी सूरज चव्हाण यांच्याबाबतही असाच प्रकार घडला होता. लातूरमध्ये सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलीन झाली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांनी माफी मागून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात होती. सूरज चव्हाण यांनी राजीनामा न दिल्याने शेवटी अखेर अजित पवार यांनी स्वत:ट्विट करुन चव्हाण यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. त्याचप्रकारे आता माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. तत्पूर्वी आदल्या दिवशी माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची फोनवरुन बातचीत झाल्याची चर्चा होती. त्यामुळे काल माणिकराव कोकाटे हे आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. परंतु, माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा किंवा दिलगिरी तर सोडाच पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली होती. आपल्याकडून काहीच चुकीचे कसे घडले नाही, नेहमीप्रमाणे आपणच कसे बरोबर आहोत, हे सांगण्यातच माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद खर्ची घातली होती. हे करताना माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक घोळ घालून ठेवला. त्यांनी या पत्रकार परिषदेत 'शासन भिकारी' असल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना आता पाठिशी घालायचे नाही, असे ठरवल्याचे सांगितले जात होते. माणिकराव कोकाटे हे आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेण्यासाठी येणार होते. दुपारी तीन वाजता या दोन्ही नेत्यांची बैठक ठरली होती. मात्र, हा दौरा अचानक रद्द झाला होता. अजितदादांनी कोकाटेंना भेट नाकारल्याने आता त्यांची गच्छंती अटळ असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा

सरकारला 'भिकारी'म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान; म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget