महायुतीच्या जागा वाटपातली आतली बातमी; अजित पवार गट 60 जागांसाठी तयार, सूत्रांची माहिती
काँग्रेसचे तीन शेकाप एक आणि दोन अपक्ष या 60 जणांच्या व्यतिरिक्त आणखी देखील जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती अजित पवारांनी केली आहे .
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप निश्चित झाले नाही. मात्र तयारी सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवार यांचा युवकांच्या मेळाव्यात उल्लेख केला आहे. काँग्रेसचे हिरामण खोसकर झिशान सिद्धकी आणि सुलभा खोडके लवकरच आपल्या सोबत येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे . यासोबतच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्या सोबत असल्याचा उल्लेख अजित पवारांनी केला आहे.
अजित पवार गट 60 जागा मिळवण्याच्या तयारीत
पक्षाचे स्वतःची 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन शेकाप एक आणि दोन अपक्ष या 60 जणांच्या व्यतिरिक्त आणखी देखील जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती अजित पवारांनी केली आहे . महायुतीत आपल्याला ज्या जागा मिळतील त्या जागांवर जास्तीत जास्त काम करा इतर जागांवर थोडं काम कमी केलं तरी हरकत नाही असाही स्पष्टपणे उल्लेख केला आहे.
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात आली आहे. मात्र भाजपने 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका घेतल्याने पेच अडकल्याचे सूत्रांच्या वतीने कळत आहे. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, जागेच्या हट्टापेक्षा जी जागा जो पक्ष जिंकून येऊ शकतो त्यांनी लढावी अशी भूमिका आमची आहे. हट्टाने जागा घेणे व पुढे ती जागा पराभूत होणे हे होणार नाही यासाठी तिन्ही पक्ष पारदर्शकतेच्या चर्चा करून तोडगा काढत आहे असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
हे ही वाचा :
जागावाटपाचं गणित ठरलं? भाजप किती जागांवर उमेदवार उभं करणार? सविस्तर माहिती एका क्लिकवर