एक्स्प्लोर

Sanjay Raut: ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून अजित पवारांचं काही बरंवाईट...; संजय राऊतांच्या 'त्या' कुशंकेने चर्चांना उधाण

Sanjay Raut: अजित पवारांची जुनी वक्तव्ये चाळताणा माझ्या लक्षात आलं, अजित पवार हे पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत होते, ही त्यांनी मानिकता होती, असंही पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर (Ajit Pawar death) आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत  (Ajit Pawar death) संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आज (मंगळवारी, ता ३) माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात  (Ajit Pawar death) झाला आहे. अजित पवारांचा मृत्यू अशा एका अपघातामध्ये झालेला आहे, तो नक्की कसा घडला आणि का घडला? हे रहस्य समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. जे भाजपचे लोक माझ्यावर टीका करत आहेत. मुळात शंका मी घेतलेली नाही, तर ही शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी आणि त्यांच्या काही नेत्यांनी घेतली आहे. मी तर तो विषय पुढे नेला, कारण माझ्याकडे देखील काही माहिती आहे. अजित पवारांची जुनी वक्तव्ये चाळताणा माझ्या लक्षात आलं, अजित पवार हे पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत होते, ही त्यांनी मानिकता होती, असंही पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar death)

कुत्र्याच्या नसबंदीत भाजपने पैसे खाल्ले

भाजपसोबतचा आपला संसार फार काळ चालणार नाही. कारण शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र वेगळ्या दिशेने चालला आहे. या भूमिकेवरती हळूहळू ते ठाम झाले होते, त्यांनी तसं जाहीरपणे बोलायला सुरू केलं होतं, त्याचबरोबर भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल माझ्याकडे आहेत, असं अजित पवारांनी १५ जानेवारीच्या एका भाषणात सांगितलं होतं,  त्यावर ते वारंवार बोलत राहिले, त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका भाजपने कशी लुटली ते वारंवार सांगत होते, त्याचे पुरावे त्यांनी सत्तेत असताना त्यांनी समोर आणले, पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्याच्या नसबंदीत भाजपने पैसे खाल्ले, हे दादांनी समोर आणलं, त्यामुळे भाजप अस्वस्थ होता. अजित पवार बरीच वर्षे अर्थमंत्री असल्याने त्यांच्याकडे बरेच पुरावे जमा झाले आहेत, यावर भाजपची अंतर्गत चर्चा सुरू झाली. ही कागदपत्राबाबत त्यांचे निकटवर्तीय सांगतात. या सगळ्या फाईल आणि सगळे डॉक्युमेंट, पुरावे हे सर्व अजित पवारांच्या ताब्यात होते. अजित पवार हे सर्व शक्यतो आपल्या जवळच ठेवत होते, त्यादिवशी देखील त्यांच्यासोबत काही डॉक्युमेंट पुरावे असावेत, पण अर्ध्या तासातच त्यांचं विमान उडालं आणि अपघात झाला, याच्यावरती स्पष्टीकरण द्यायचं का? भाजप कशाला स्पष्टीकरण देते, याबाबत चौकशी समिती नेमावी आणि ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमावी, हेच मी म्हणालो बाकी मी काय म्हणालो, असंही पुढे राऊत म्हणालेत.  (Ajit Pawar death)

याबाबत एक निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे

भुजबळ आता म्हणत आहेत, विमान घिरट्या घालत होतं आणि अचानक कोसळलं काहीतरी झालं असावं, यावर बोलताना राऊत म्हणाले, मी वेगळं काय सांगतो आहे, फक्त माझी चूक एवढीच आहे की मी सगळ्यात आधी सांगितलं, आता हळूहळू लोक मानसिक दृष्ट्या स्थिर स्थावर झाल्यावर त्यावर विचार करत आहेत, अजित पवारांनी हा पहिल्यांदाच विमान प्रवास केलेला नाही, चार्टर विमान आणि हेलिकॉप्टर याद्वारे ते प्रवास करत होते, त्यामुळे या सगळ्याचं व्यवस्थापन करणाऱ्या लोकांना पायलट आणि बाकी गोष्टी माहिती असतात. त्यांच्याच पक्षाच्या अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले, त्याचबरोबर छगन भुजबळ ही बोलले, अजित पवार यांच्या कुटुंबातील काही लोक यावर चर्चा करत आहेत, मला असं वाटलं संसदेत हा मुद्दा आला पाहिजेत मी तो मांडला, आणि मागणी केली की याबाबत एक निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमावी आणि त्याचा कालमर्यादित अहवाल आणि निर्णयावर अशीच आमची मागणी आहे पुढे संजय राऊत यांनी म्हटले. 

 भाजपाच्या विरोधात जातो तो एकतर तुरुंगात जातो किंवा..

मंत्र्यांना याबाबत काहीच माहिती नाही, आम्हाला कालमर्यादेमध्ये यासाठी रिपोर्ट हवा आहे की, अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय नेत्याचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्र अजूनही धक्क्यात आहे, सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून महाराष्ट्र धक्क्यातून सावरतो असं होत नाही. तो अपघात विसरला असं होत नाही, ते राजकारण वेगळं आहे आणि आम्ही म्हणतो अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भातल्या आमच्या भूमिका वेगळ्या आहेत, दोन्हीपक्ष एकत्र येणार होते, त्यामध्ये अडचण होती ती मोदी, शहा आणि फडणवीस यांची, अजित पवार भाजपाला सोडून पुन्हा शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सर्वात मोठा पराभव झाला असता, त्यामुळे अजित पवार यांचा अपघात देखील ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? असा प्रश्न लोकांनी विचारलेला आहे, भाजपाच्या विरोधात जातो तो एकतर तुरुंगात जातो किंवा आपल्या जीव गमावतो अशी परिस्थिती दिसत आहे, असंही राऊत म्हणालेत.

हा पक्ष मराठीचा राहिलेला नाही, अजित पवारांच्या पक्षाचा चेहरा महाराष्ट्राचा आणि मराठमोळा होता. आता गिधाड त्यांच्या पक्षावर तुटून पडणार आहेत आणि त्या पक्षाची लचके तोडणार आहेत, असंही राऊत म्हणालेत, एनडीएची बैठक पार पडत आहे, त्यामध्ये प्रफुल पटेल यांच्यावरती मोदींना हार घालण्याची जबाबदारी दिली आहे यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, हो त्यांनी तर खूप मोठं काम केलेलं आहे ना. आता अलीकडच्या काळात आपण पाहिले असेल संसदेच्या आवारात अमित शहा आणि प्रफुल पटेल यांच्या फोटो आलेले आहेत, हातात हात घालून असे घट्ट मिठी मारून चाललेले आहेत. म्हणून तर आम्हाला शंका येते आहे. अजित पवारांच्या बाबतीत, ज्या आमच्या मनात शंका निर्माण झालेल्या आहेत, त्यासाठीच आहेत, अजित पवारांचं काही ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून बरं वाईट तर झालं नाही ना हे दुर्दैवाने आम्हाला मनापासून वाटत आहे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget