Ajit Pawar : जमीन सरकारची त्याच्यावर पीक दुसऱ्याचं, पैसे तिसऱ्याच्या अकाऊंटला जातात अशा तक्रारी, अजित पवार 1 रुपयात पीक विमा योजनेवर काय म्हणाले?
Ajit Pawar : बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना धडे दिले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी सूचना देखील केल्या.

बीड : उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीड जिल्ह्यातील नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला बीडमध्ये चांगलं यश मिळालं. आपल्याला पाच जागा मिळाल्या तर बीडची जागा आपल्या हातून गेल्याचं ते म्हणाले. अजित पवार यांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या आणि सल्ले देखील दिले. यावेळी पीक विमा (Crop Insurance) गैरप्रकारासंदर्भात देखील अजित पवार यांनी भाष्य केलं.
बीडच्या परिसरात अनेक प्रकारच्या बातम्या पेपरला वाचत असतो. ज्यात तथ्य असेल तिथं संबंधितांवर कारवाई केली जाईल. जिथं तथ्य नसेल तिथं त्या संदर्भात कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही. राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या सेलचे पदाधिकारी आहेत त्यांना सांगायचं आहे माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. उद्या कुठली कामं मंजूर झाली तर ती दर्जेदार असली पाहिजे, तर ते सहन करणार नाही. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, जवळचा लांबचा असं काही बघणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.
जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे, इथं कुठंही गडबड होता कामा नये, कारण मर्यादित पैसा असतो. केंद्राचा पैसा कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नये, अशी सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून पुढं जायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.
खंडणी मागू नका, मकोका लावायला मागं पुढं बघणार नाही : अजित पवार
विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करु नये. माझ्या कानावर आल्यावर मकोका लावायला मागं पुढं बघणार नाही. बीडचं पालकमंत्रिपद स्वीकारत असताना चांगल्या कामाला साथ मिळाली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं. जे अधिकारी बराच काळ आहेत, त्यांना बदललं जाईल. जे रिवॉल्व्हर वर लावून फिरत असलीत त्यांचं लायसन्स रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत. रील जे बनतात ते खपवून घेणार नाही. बदल झालाय हे मला पण जाणवलं पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांना जाणवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवावं, असा सल्ला देखील अजित पवारांनी दिला.
पीक विम्यावर अजित पवार काय म्हणाले?
एक रुपयात पीक विमा आहे, जमीन कुठली दाखवली जाते गायरानाची, जमीन कुठली दाखवली जाते देवस्थानची, जमीन सरकारची, पीक दुसऱ्याचं अन् पैसे तिसऱ्याच्या खात्यात जातात, अशा तक्रारी महाराष्ट्रातील आहेत, तुमच्या नाहीत महाराष्ट्रातील. आपण सगळं तपासणार आहे, इथंल्या असल्या तर तपासणार, असं अजित पवार म्हणाले .
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
