ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2024 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1.खातेवाटपाची चर्चा जवळजवळ संपत आलीय, हिवाळी अधिवेशनाअगोदर मंत्रिमंडळ विस्तार, गृहखात्याबाबत निर्णय होईल तेव्हा सांगेन, देवेंद्र फडणवीसांची एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत माहिती https://tinyurl.com/yc7taj2e मी बेस्ट सीएमसाठी नाही,जनतेचं काम करण्यासाठी आलोय, देवेंद्र फडणवीसांचं एकनाथ शिंदेंच्या लोकप्रिय मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर भाष्य https://tinyurl.com/mr3x4x99
2.एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला लागणार होती,त्यांच्याशिवाय शपथविधीची तयारी भाजपने केलेली माझ्याकडे पक्की माहिती, संजय राऊतांचा दावा https://tinyurl.com/mu7jnk2v महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता,पण आमचं सर्व ठरलं होतं, संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर हल्लाबोल https://tinyurl.com/muas9nhy संजय राऊतांना आवरलं नाही तर उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं काही खरं नाही, त्या आमदारांनी राऊतांपासून सावध राहावं,शंभूराज देसाईंचा इशारा https://tinyurl.com/yfem3yn3
3.मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मोठे बदल दिसणार; पक्ष संघटना वाढीसाठी काम, शिवसेनेच्या वाढीसाठी काम, प्रचारातील कामगिरीचा विचार करणार,एकनाथ शिंदे निकष लावून मंत्रिपद देणार https://tinyurl.com/3wrxyb9u दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता, मंत्रिपद देताना एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेणार असल्याच्या चर्चा https://tinyurl.com/z5vsj5n6
4.राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी,अजित पवारांसमोर उमेदवारांनी अडचणी मांडल्या, पुढील निवडणुकीच्या कामाला लागा, पूर्ण ताकद देणार, दादांची ग्वाही https://tinyurl.com/3x7d4xba मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घडामोडींना वेग; उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक, अजित पवार,सुनील तटकरे अन् प्रफुल पटेल यांच्यात तासभर खलबतं https://tinyurl.com/ybj2ydmx
5.विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती होणार,नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार, नियमानुसार काम करणार अशी कोळंबकरांची भूमिका https://tinyurl.com/edm75d7t
6.लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेणार,निकषाबाहेर लाभ घेतलेल्यांबाबत विचार करणार,देवेंद्र फडणवीस यांनी मांडली भूमिका https://tinyurl.com/53hmcjzh पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 42486 महिला लाडकी बहीण योजनेतून ठरल्या अपात्र https://tinyurl.com/3yken9cb
7.काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवींच्या बाकाखाली नोटा सापडल्या,राज्यसभेतील गोंधळात सत्ताधारी विरोधक आमने सामने, प्रकरणाची चौकशी करणार, राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकड यांची घोषणा https://tinyurl.com/yzfz5xep
8.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सलग 11 व्यांदा रेपो रेट जैसे थे,वाहन खरेदी कर्ज घेणाऱ्यांसह गृह कर्जदारांची यावेळीही निराशा https://tinyurl.com/y2mp5zh7 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कृषी कर्जाची मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली, कोणत्याही हमीशिवाय शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज https://tinyurl.com/2htrc248
9.राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; छत्रपती संभाजीनगर, लातूर, सिंधुदुर्ग, नाशिकमध्ये पावसाची हजेरी, पिकांच्या नुकसानामुळं शेतकरी चिंतेत https://tinyurl.com/49pnnu48
10.ॲडिलेडच्या पिंक बॉल कसोटीत भारत पहिल्या डावात 180 धावांवर बाद, गोलंदाजांच्या माऱ्यापुढं भारताची फलंदाजी ढेपाळली,ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 81 धावा https://tinyurl.com/3jh8zh9v
एबीपी माझा स्पेशल
महामानवाचं महापरिनिर्वाण जेव्हा ज्ञानसूर्य अस्ताला गेला! https://youtu.be/jhV5fTDRq8c?feature=shared