दोन तासांपासून मतदान खोळंबले, ईव्हीएम बंद पडल्यानं 'भावोजी' संतापले; मुंबईतील पवई हिरानंदानी भागातला प्रकार
Mumbai Lok Sabha Election : ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी संताप व्यक्त केला आहे. मतदान बंद असतानाच लांडेंना आत सोडलंच कसं असा सवाल विचारण्यात येतोय.
मुंबई : पवई हिरानंदानी भागात अजूनही राडा सुरूच आहे. पवई हिरानंदानी भागात दोन तासांपासून मतदान खोळंबलं होतं. बंद पडलेलं मतदान यंत्र बदलूनही मतदान खोळंबलेलंच आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे (Dilip Lamde) यांना आत सोडल्याने गोंधल अजून वाढला. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी संताप व्यक्त केला आहे. मतदान बंद असतानाच लांडेंना आत सोडलंच कसं असा सवाल विचारण्यात येतोय.
पवईत ईव्हीएम मशीन बंद असल्याची तक्रार अभिनेता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकरांनी दुपारी 12 च्या सुमारास केली आहे. त्यानंतर जवळपास तासाभरानं इव्हीएम रिप्लेस केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. मात्र त्यानंतर एक तास उलटून गेलाय पण अजूनही त्यांचं मतदान झालं नाही. अभिनेता आदेश बांदेकर, त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह 100 च्या आसपास लोक मतदानासाठी ताटकळले आहेत .
View this post on Instagram
सर्वांना समान न्याय हवा : आदेश बांदेकर
आदेश बांदेकर म्हणाले, सर्वांना समान न्याय हवा. कोण सेलिब्रिटी, कोण मतदार असे काही नसते. मतदारांना चार - चार रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यापेक्षा गतीमान मतदानाची व्यवस्था केली असते तर चांगले झाले असते. लोकांचा उद्रेक आहे हे सर्वांना माहीत आहे.मतदानाचे वेळीच नियोजन होणे गरजेचे होते. काही मतदान केंद्रात खूप गर्दी आहे तर काही मतदान केंद्र रिकामे पडले होते. हा प्रकार पाहून हा रणनीतीचा भाग होता की काय? असा सवाल मनात शंका येत आहे.
जवळपास साडेतीन तास मतदान केंद्रावर : केदार शिंदे
मी सर्वसामान्य मतदार म्हणून मतदान करायला आलो आहे. कोणी दिग्दर्शक किंवा अभिनेता म्हणून मतदान करायला आलेलो नाही. माझ्या त्रासाइतका त्रास इतरांना झाला आहे. कधीच असे होत नाही. 15 मिनिटात मतदान करुन आम्ही गेलो आहे. हे पहिल्यांदाच होत आहे. जवळपास साडेतीन तास मतदान केंद्रावर आहे. मतदान केल्याशिवाय जाणार नाही, असे केदार शिंदे म्हणाले.
अभिनेत्री भाग्यश्री देखील 2 तास रांगेत उभी
अभिनेत्री भाग्यश्री हिला देखील मतदानासाठी रांगेत दोन तास उभं राहावं लागलं. त्यावर तिने निवडणूक आयोगावरही संताप व्यक्त केला. भाग्यश्री ही जुहू येथील जमनाबाई नरसी या मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहचली होती. त्यावेळी तिला मतदान करण्यासाठी तब्बल दोन तासांचा अवधी लागला. त्यामुळे तिने निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
हे ही वाचा :
Lok Sabha Election 2024 : सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग