एक्स्प्लोर

Parbhani Soybean : महिनाभरापासून परभणीत पावसाची दडी, सोयाबीन चाललं वाळून, शेतकरी संकटात

परभणी (Parbhani) जिल्ह्यातही गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Parbhani Soybean News : सध्या राज्याच्या काही भागात चांगाल पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. मात्र, काही भागात पावसानं दडी मारल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी महिनाभरापासून पाऊस नसल्यानं तेथील शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातही गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाअभावी ऐन शेंगा भरण्याच्या मोसमात सोयाबीन (Soybean) वाळू लागलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी कालव्यांद्वारे प्रकल्पातील पाणी सोडण्याची मागणी केली आहे.


Parbhani Soybean : महिनाभरापासून परभणीत पावसाची दडी, सोयाबीन चाललं वाळून, शेतकरी संकटात

परभणी जिल्ह्यात 3 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड

गेल्या महिनाभरापासून परभणी जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत कारण सोयाबीन पिक पाण्याअभावी वाळू लागलं आहे. सध्या सोयाबीन पिकाला पाण्याची गरज आहे. कारण पिक शेंगा भरण्याच्या मोसमात आहे. याकाळात जर सोयाबीनला पामी कमी पडले तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात यंदा जवळपास 3 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे. 


Parbhani Soybean : महिनाभरापासून परभणीत पावसाची दडी, सोयाबीन चाललं वाळून, शेतकरी संकटात

सोयाबीनसह इतर पिकही लागली वाळू

सुरुवातीच्या काळात सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळं सोयाबीन पिक पिवळे पडले होतो. मात्र, शेतकऱ्यांनी विविध फवारण्या करुन पिक कसेबसे वाचवले होते. मात्र, मागच्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसानं उघडीप दिल्यानं शेंगा भरण्याच्या मोसमातच सोयाबीन वळून जात आहे. तर इतर पिकंही कोमेजली आहेत. गेल्या महिनाभरापासून पाऊस नाही, सुरुवातीला मोठा पाऊस झाला. त्यामुळ सोयाबीन पिवळं पडलं होते. मात्र अनेक फवारण्या केल्यावर कसेबसे सोयाबीन वाचले होते. मात्र, आता पाण्याची गरज असताना पाऊस पडत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आम्ही एकरी सोयाबीनला 20 हजार रुपयांचा खर्च केला आहे. शासनानं आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पीक विमा द्यावा. हेक्टरी 50 हजार रुपयांची दत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

दरम्यान, कालपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. विशेषत: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात जोराचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळणार असून, शेवटच्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (109 टक्के) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यामध्ये काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. देशाचा पूर्वोत्तर भाग आणि पश्चिम-उत्तर राज्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. प्रशांत महासागरात ‘ला नीना’ स्थिती कायम आहे. अशा वातावरणात सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या जवळ किंवा त्यापेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणाऱ्या उत्तर-पश्चिम भागासह दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये काही भागातच तापमानात वाढ दिसून येईल.

 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget