एक्स्प्लोर

Parbhani News : परभणीत 17 लाखांची बोगस कीटकनाशकं जप्त, पाच जणांना ठोकल्या बेड्या  

Parbhani News Update : परभणीतील मानवतमध्ये कृषी केंद्र चालकाकडून 17 लाख रूपयांची बोगस कीटकनाशकं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.  

Parbhani News Update : परभणीच्या (Parbhani) मानवतमध्ये शेतकऱ्यांनी (Farmer ) बोगस कीटकनाशकं पकडली आहेत. या प्रकरणी मानवत पोलिसांनी बुलढाण्याच्या (Buldhana) मेहकर येथून एका कृषी केंद्र चालकाला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 17 लाख रूपयांचे बोगस कीटकनाशक जप्त करण्यात आले आहे.  कृषी केंद्र चालकासह या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.  सतीश तरोडकर, दत्ता शिंदे, मुकेश राठी, श्रीराम गिरी आणि किशोर आंधळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मानवत परिसरामध्ये 9 ऑगस्ट रोजी एका कारमधून पेन्सी बायो या कंपनीचे बायो आर 303 हे बोगस फवारणी औषध विक्री केले जात असल्याची माहिती काही शेतकऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सुनील बावळे, अर्जुन पंडित या शेतकऱ्यांनी कारचा पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी 4 लाख 65 हजार 2376 रुपयांचे बोगस औषध असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मानवत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

बुलढाण्यातील मेहकर येथून किशोर आंधळे याला अटक करण्यात आली होती. त्याची विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मेहकर येथील उटी या परिसरातून याच बायो आर कंपनीचे बोगस कीटकनाशक जप्त केले आहेत.पोलिसांनी 47 बॉक्स बोगस कीटकनाशक जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या बोगल किटकनाशकाची किंमत 17 लाख रुपये एवढी आहे.

यापूर्वी देखील 4 लाख 66 हजार रुपयांची बोगस औषधे आणि आता 17 लाख 30 हजार असा एकूण 22 लाख रूपयांची बोगस औषधे जप्त करण्यात आली असून या प्रकरणाी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने आणखी कुठे कुठे ही बनावट औषधे विक्री केली आहेत आणि किती प्रमाणात केली आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. 

दरम्यान, या प्रकरणावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून याबाबत दोषींवर कोठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. आगामी काळात तरी अशा बोगस बीयाने आणि औषधांची विक्री करणाऱ्यांवर वचक बसेल असे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. 

महत्वाच्या बातम्या

Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna : एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, चुकीच्या माणसाला लाभ मिळू नये ; कर्मचाऱ्यांना निर्देश 

शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीला घाम फोडण्याच्या तयारीत! पोलिसांकडून रोखण्यासाठी नाकाबंदी सुरु   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Embed widget