एक्स्प्लोर

शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीला घाम फोडण्याच्या तयारीत! पोलिसांकडून रोखण्यासाठी नाकाबंदी सुरु  

Farmers Protest at Jantar Mantar : जंतर-मंतर येथे शेतकऱ्यांच्या निदर्शन करण्यासाठी आवाहनापूर्वी दिल्ली पोलिसांनी दिल्ली-हरियाणाला जोडणाऱ्या टिकरी सीमेवर सिमेंटचे बॅरिकेड्स उभारण्यास सुरुवात केली आहे

Farmers to Protest at Jantar Mantar : किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) हमीसह आणखी अनेक मागण्या घेऊन शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीला घामटा फोडण्याचा विचारात आहेत. उद्या सोमवारी जंतर-मंतर येथे शेतकऱ्यांकडून निदर्शन करण्याच्या आवाहनापूर्वी दिल्ली पोलिसांनी दिल्ली-हरियाणाला जोडणाऱ्या टिकरी सीमेवर सिमेंटचे बॅरिकेड्स उभारण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली आहे. निदर्शनासाठी शेतकरी दिल्लीत पोहोचू लागले आहेत.

दिल्लीकडे येत असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनाही दिल्ली पोलिसांनी रविवारी गाझीपूर सीमेवर रोखले. राकेश टिकैत यांना त्यांच्या काही समर्थकांसह दिल्लीला जायचे होते, मात्र दिल्ली पोलिसांनी नकार दिला. यानंतर टिकैत समर्थकांनी रस्त्यावर बसून विरोध करण्यास सुरुवात केली, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सर्वांना मधु विहार पोलिस एसीपी कार्यालयात नेले.

टिकैत यांनी शुक्रवारी देशभरातील शेतकर्‍यांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या देशव्यापी आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, देशव्यापी आंदोलन केव्हा, कुठे आणि कसे होईल, एसकेएमचे नेते योग्य वेळी त्याची माहिती देतील.

येत्या 6 सप्टेंबरला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार 

युनायटेड किसान मोर्चाचे (एसकेएम) नेते राकेश टिकैत यांनी शनिवारी सांगितले की केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा 'टेनी' यांना मंत्रिमंडळातून निलंबित करणे आणि किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्यासाठी कायदा लागू करणे यासह अनेक मागण्यांसह लखीमूपर खेरी येथील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन संपले. शेतकऱ्यांना संबोधित करताना टिकैत म्हणाले की, 6 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत एसकेएमची भविष्यातील रणनीती तयार केली जाईल.

एसकेएमने गुरुवारी सकाळी लखीमपूर शहरातील राजापूर मंडी समितीसमोर धरणे सुरू केले. गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांची हकालपट्टी, तुरुंगात असलेल्या निरपराध शेतकर्‍यांची सुटका, एमएसपी हमी कायदा, वीज दुरुस्ती विधेयक 2022 मागे घेण्यात यावे, उसाचे पेमेंट यासह विविध मागण्यांसाठी एसकेएमने धरणे आंदोलन केले होते. 

लखीमपूर खेरी हा केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मूळ जिल्हा आहे आणि ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खेरीमधून सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jalna Lok Sabha : Jarange-Vanchit सामाजिक युतीचे फायदे-तोटे; कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय?ABP Majha Headlines : 9 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदाVare Nivadnukiche : निवडणुकीची प्रत्येक बातमी एका क्लिकवर : 28 March 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Hemant Godse : खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
Embed widget