(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani News : लोकसभेच्या जागेसाठी महायुतीत कलगी तुरा, शिवसेना अन भाजपच्या दाव्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी
Lok Sabha Election 2024 : महायुतीत जागेसाठी जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप आणि शिवसेनेकडून परभणी लोकसभेसाठी दावा करण्यात येत आहे.
BJP-Shiv Sena News : लोकसभेच्या जागेवरून (Lok Sabha Election 2024) भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) कलगीतुरा रंगला आहे. महायुतीतील शिवसेना (Shiv Sena) अन भाजपच्या (BJP) दाव्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महायुतीत जागेसाठी जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. भाजप आणि शिवसेनेकडून परभणी लोकसभेसाठी दावा करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसं-तसं जागांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परभणीत तर, महायुतीमध्ये परभणी लोकसभेच्या जागेवरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या उमेदवारी बाबत ही जागा आम्हीच लढवणार आणि जिंकणारही असा दावा करण्यात येत आहे. या दाव्यांमुळे एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवाद काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे तर, दुसरीकडे महायुतीमधील बेबनाव ही समोर आला आहे.
लोकसभेच्या जागेसाठी जोरदार आरोप प्रत्यारोप
परभणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली पाथरीत बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी पेक्षा मोठी ताकद ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आहे. तसेच परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ही जागा आम्हीच लढवणार आणि ती जिंकणार असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तर, दुसरीकडे भाजपनेही कंबर कसली असुन लोकसभेबाबत अनेक बैठका पार पडल्या आहेत.
शिवसेना-भाजपकडून जोरदार तयारी
लोकसभेसाठी भाजपकडूनही जोरदार तयारी केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे पक्षाच्या संघटना परभणीत गावोगावी आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांच्या 400 पार जागासाठी परभणीची जागा आम्ही लढवणार, तशी मागणी सर्वांनी मिळून पक्षाकडे केल्याची माहिती भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. महायुतीतील दोन्ही पक्षाच्या या दाव्यांमुळे परभणी लोकसभेत तयारी करीत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची मात्र मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
निधीवाटपावरूनही राजकारण तापलं
आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) निधी वाटपावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. परभणी जिल्हा नियोजन समितीचा निधी न्यायालयात अडकल्यावरून भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांनी शिवसेना खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे (Vijay Bhamble) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका गावातील शाळेची झालेली दुरवस्थाबाबत बोलतांना बोर्डीकर यांनी ही टीका केली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
लोकसभा निवडणुकीपूर्वीच परभणीतील राजकीय वातावरण तापलं; मेघना बोर्डीकरांचा संजय जाधवांवर गंभीर आरोप