एक्स्प्लोर

Gujrat Boat in Pakistan Coustody : भारताच्या 2 बोटी पाकिस्तानच्या ताब्यात; बोटींवरील 16 खलाशांना अटक, 7 जण पालघर जिल्ह्यातील

Gujrat Boat in Pakistan Coustody : गुजरातमधील दोन बोटी पाकिस्ताननं ताब्यात घेतल्या असून त्या बोटींवरील एकूण 16 खलाशांना अटक केली आहे. यापैकी 7 खलाशी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील आहेत.

Gujrat Boat in Pakistan Coustody : खोल समुद्रात मासेमारी करताना भरकटलेल्या दोन बोटींना पाकिस्ताननं (Pakistan) ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या बोटीवरील एकूण 16 जण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. यामधील 7 जण पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. पालघरमधील मच्छिमार संघटनेनं (Fishermen's Association in Palghar) यासंदर्भात माहिती दिली आहे. या सर्वांना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनं (Pakistan Maritime Security Agency) ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही पालघरमधील मच्छिमार संघटनेनं दिली आहे. 

पालघर (Palghar News) जिल्ह्यातील खलाशी मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी गुजरातमधील (Gujrat) ओखा (Okha Port) आणि पोरबंदर (Porbandar Port) या भागात जात असतात. जवळपास दहा ते बारा हजार मच्छीमार कामगार पालघर जिल्ह्यातून (Palghar District) या भागांत रोजगारासाठी जातात. याच भागातील दोन बोटी भरकटल्यानं पाकिस्तान हद्दीत गेल्या आहे. त्यामुळे या बोटींवरील एकूण सोळा मच्छीमार खलाशी मजूर यांना पाकिस्तान सैनिकांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. यामधील सात खलाशी मच्छीमार कामगार पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. 

गुजरातच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या दोन बोटी आणि त्यातील 16 खलाशांना पाकिस्तानी सैनिकांनी अटक केली आहे. 7 खलाशी पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील बोर्डी जवळील एका गावातील हे मच्छीमार खलाशी कामगार आहेत. 

गुजरातमधील ओखा येथील मत्स्यगंधा आणि अन्य एक मच्छीमार बोट मासेमारीसाठी गेली होती. या बोटींवरील एकूण 7 खलाशी पालघर जिल्ह्यातील आहेत. पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनं या सर्व खलाशांना ताब्यात घेतलं असून त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भातील माहिती पाकिस्तान-इंडिया पीपल्स फॉर्म फॉर पीस अॅन्ड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी दिली आहे. 

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पालघरमधील 7 खलाशांची नावं : 

  1. 1. नवशा महाद्या भिमरा
  2. सरित उंबरसाडा
  3. विजय नागवंशी
  4. जयराम ठाकर
  5. उमजी पाडवी
  6. विनोद कोल
  7. कृष्णा बुजड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Embed widget