Palghar : पालघर जिल्ह्यात 7 जुलैला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय, शिक्षक-कर्मचाऱ्यांना मात्र शाळेत उपस्थिती बंधनकारक
Palghar Red Alert : विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर झाली असली तरी शिक्षक- कर्मचाऱ्यांना मात्र स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनेचं काम करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटलं आहे.

पालघर : जिल्ह्यात 7 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी या संबंधित आदेश जारी केले आहेत. अस असलं तरी मुख्याद्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मात्र कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावं लागणार आहे.
पालघर जिल्ह्यात सोमवारी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं. सोमवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या रेड अलर्ट इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 7 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Palghar School Closed : सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये हा आदेश जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे, पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अतीमुसळधार पावसाची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, खाजगी आणि अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) यांना एक दिवसीय सुट्टी जाहीर केली आहे.
शिक्षक-कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावं लागेल
मात्र, शाळा आणि महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस
मुंबईमध्ये वीकेंडला पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. रविवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. दादर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं. तर ठाण्यातंही पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं.
नाशिकमध्ये रविवारी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे गंगापूर धरणात 60 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा निर्माण झाला. त्यानंतर गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 5 हजार 186 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
ही बातमी वाचा :
























