एक्स्प्लोर

Palghar News : भाजपच्या माजी नगरसेविकेचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; प्रभाग रचना जाहीर होताच पालघरमध्ये राजकारण तापलं, नेमकं काय घडलं?

Palghar News : पालघर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांपूर्वी प्रभाग रचनेवरून मोठा वाद पेटला आहे. भाजपच्या माजी नगरसेविकेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

Palghar News : पालघर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांपूर्वी प्रभाग रचनेवरून मोठा वाद पेटला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत (Alka Rajput) यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ही प्रभाग रचना राजकीय दबावातून बदलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  

पालघर नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी आरोप केला आहे की, ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना मंत्रालयात बोलावून दबाव टाकला आणि मनमर्जीने प्रभाग रचना बदलण्यास भाग पाडले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

प्रस्ताव थांबवून बेकायदेशीर बदल

५ ऑगस्टच्या रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव थांबवून बेकायदेशीर बदल करण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी मंत्रालयात तो प्रस्ताव पाठवण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या बदलामुळे सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनाही फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील भाजपचे माजी नगरसेवकही यामुळे नाराज असून जिल्हा पातळीवरील राजकीय गोटात मोठी खलबते सुरू आहेत. त्यातच पालकमंत्री गणेश नाईक यांनी देखील लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे. 

प्रारूप प्रभाग रचना नियमानुसार : जिल्हाधिकारी

दरम्यान, पालघर नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना नियमानुसार झालेली आहे. आक्षेप किंवा सूचना असल्यास नागरिकांनी नोंदवाव्यात, असं मत पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केलं आहे. प्रभाग रचनेवरील या आरोपांमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आक्षेप नोंदवण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

दरम्यान, पालघर नगर परिषदेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भौगोलिक सीमांसह प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या रचनेविषयी नागरिकांकडून 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रारूप प्रभाग रचना सन 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारे तयार करण्यात आली असून, नगर परिषद क्षेत्रातून एकूण 30 सदस्यांची निवड होणार आहे. शहराची एकूण लोकसंख्या 68,930 इतकी असून, यापैकी 3,419 लोकसंख्या अनुसूचित जातींची, तर 9,720 लोकसंख्या अनुसूचित जमातींची आहे. प्रभाग रचनेनुसार, नगर परिषदेत दोन सदस्य असलेल्या 15 प्रभागांची आखणी करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागासाठी सरासरी 4,595 लोकसंख्या गृहीत धरून ही रचना करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dadar Kabutar Khana : कबूतरखान्यासंदर्भात मोठी अपडेट, 13 सदस्यीय समितीची स्थापना, कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम तपासणार, कोणा-कोणाचा समावेश?

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन; विखे पाटील अध्यक्षपदी, महाजन, भूसे, सामंत, कोकाटेंचाही समावेश

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Embed widget