BSF Jawan Death : साप चावल्याने पालघरमधील बीएसएफ जवानाचा पठाणकोटमध्ये मृत्यू
BSF Jawan Death : बीएसएफ जवान महेश फडवळे यांच्या डाव्या हाताला साप चावला होता. त्यांना पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पालघर : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे गावचे सुपुत्र महेश रामा फडवळे या जवानाला वीरमरण आले आहे. पंजाब प्रांतातील पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असणाऱ्या महेश रामा फडवळे यांना वीरमरण आले आहे. महेश रामा पडवले यांचं पार्थिव रात्री मुंबईत आल्यानंतर आज (6 जून) त्यांच्यावर कऱ्हे या मूळगावी या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पठाणकोटमधील बीएसएफचे BN मुख्यालय 58 माधोपूर जवळ थारियाल गावात महेश रामा फडवले हे 2019 पासून भाड्याच्या घरी राहत होते. 5 जून रोजी कर्तव्य बजावत असताना जवान महेश फडवळे यांच्या डाव्या हाताला साप चावला होता. या घटनेची माहिती मिळताच एक रुग्णवाहिका आणि नर्सिंग असिस्टंटला त्याच्या घरी पाठवण्यात आले. महेश फडवळे यांना पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आले. त्यानंतर लगेच महेश फडवळे यांच्या पत्नी श्रीमती परमिला पडवले यांनी या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल किंला मृत्यू प्रमाणपत्रानंतर निश्चित करण्यात येईल. त्यांच्या पश्चात वडील रामा फडवळे, आई रख्मी फडवळे, पत्नी परमिला फडवळे आणि मुलगी नॅन्सी फडवळे असा परिवार आहे.
ऑपरेशन मेघदूतमध्ये शत्रूशी लढताना जखमी झालेल्या जवानाचा साताऱ्यात निधन
सियाचीन येथे ऑपरेशन मेघदूतमध्ये शत्रूशी लढताना जखमी झालेले विपुल दिलीप इंगवले यांचे उपचारादरम्यान निधन झाले. जखमी झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. घरी त्रास झाल्यावर त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे हे विपुल यांचे गाव आहे. त्यांचे पार्थिव आज सकाळी दहा वाजता गावात पोहोचणार आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे.
इतर बातम्या