एक्स्प्लोर

काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना

येथील धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या दोन्ही तरुणांचा बुडून मृत्य झाला असून दोघाही तरुणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पालघर : पावसाळा संपला असून हिवाळ्याची सुरुवात होत आहे, त्यामुळे पावसाळ्यानंतर झालेल्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी, निसर्ग पर्यंटनासाठी नागरिक बाहेर पडत आहेत. त्यातच, दिवाळी सुट्ट्यांचं नियोजन करुनही पर्यटनस्थळी फिरण्यास, आनंद घेण्यास जात आहेत. दरम्यान, पालघर (Palghar) जिल्ह्यात पर्यटनासाठी (tourist) आलेल्या दोन तरुणांच्या जीवावर बेतलं. जव्हारच्या काळ मांडवी धबधब्यात बोईसरमधून पर्यटनासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना ऐन दिवाळीत घडली. या घटनेनं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

येथील धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या दोन्ही तरुणांचा बुडून मृत्य झाला असून दोघाही तरुणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. अखिलेश रामदेव मिश्रा (27) आणि खुर्शीद मुस्ताक अहमद नाईक (31) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे असून ते बोईसर मधील रहिवासी आहेत. दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी बोईसरवरुन जव्हारच्या काळ मांडवी धबधब्यावर गेलेल्या पाच तरुणांपैकी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. बोईसरमधून 5 तरुण फिरण्यासाठी काळमांडवी धबधब्यावर गेले होते, त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. 

दरम्यान,  जव्हारचा काळमांडवी धबधबा हा धोक्याचा धबधबा असून दरवर्षी या धबधब्याच्या प्रवाहात बुडून काही लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे, येथील पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना अगोदरच प्रशासनाकडून सतर्क केले जाते. दरम्यान, गुरुवारी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीत बुडून 4 ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

माढ्यात 4 जणांचा मृत्यू

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी माढा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. माढा तालुक्यातील सीना नदीत यवतमाळ जिल्ह्यातील 4 ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले आहेत.  ही घटना तालुक्यातील खैराव येथे घडली आहे. अद्याप यातील एकाही मजुराचा शोध लागला नाही. शोधकार्य सुरु आहे. चार ऊसतोड मजूर सीना नदीपात्रात बुडाले आहेत. हे सर्व मजूर यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. ऊसतोड करण्यासाठी या भागात आले होते. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. अद्याप यापैकी एकाचाही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेत बुडलेल्या मजुरामध्ये शंकर विनोद शिवणकर (वय 25), प्रकाश धाबेकर (वय 26), अजय महादेव मंगाम (वय 25), राजीव रामभाऊ गेडाम (वय 26) सर्व रा. लसणा टेकडी ता. जि. यवतमाळ हे ऊसतोड मजूर आहेत. 

हेही वाचा

मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Embed widget