मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला
India vs Pakistan War: पंतप्रधान मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केलीय.

India vs Pakistan War: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी भारत आणि पाकिस्तान (Pakistan Army) दोन्ही बाजुंकडून सीमारेषेवर सैन्याची जमवाजमव सुरु आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना, दोन्ही देशांच्या लष्कराने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरे केल्या असताना दुसरीकडे पाकिस्तान मधील एका नेत्याने मोठे विधान करत पाकिस्तानला सावधतेचा इशारा दिला आहे.
भारताकडून मोठ्या हल्ल्याची पाकिस्तानने तयारी ठेवली पाहिजे. भारत कधीही जोरदार हल्ला करू शकतो. शिवाय देशातील नागरिकांचा संताप पाहता पंतप्रधान मोदींकडे (Narendra Modi) प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी (Fawad Hussain Chaudhry) आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे.
नेमक काय म्हणाले फवाद हुसैन चौधरी?
पाकिस्तानमधील बहुसंख्य लोकांचा असा विश्वास आहे की सुरुवातीला कोणताही हल्ला होणार नाही आणि भारताचा हल्ला जास्तीत जास्त पुलवामा नंतरच्या हल्ल्यासारखाच असेल आणि पुढेही नाही! हल्ला किती मोठा असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे, परंतु जर तुम्ही भारतीय माध्यमांकडे पाहिले तर मोदींकडे हल्ला न करण्याचा पर्याय नाही. दुर्दैवाने, पाकिस्तानातील सत्ताधारी वर्गातील लोकांना एकत्र करण्याची गरज वाटत नाही आणि आपले मतभेद कमी होण्याऐवजी वाढले आहेत. वैयक्तिकरित्या, माझे विश्लेषण असे आहे की पाकिस्तानने भारताच्या मोठ्या हल्ल्यासाठी तयार असले पाहिजे, जो कधीही अपेक्षित आहे! असे मत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी व्यक्त केलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर, भारताच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानचे अनेक नेते म्हणत आहेत की आम्हाला भारतासोबत युद्ध नको आहे. त्याचवेळी, पाकिस्तानमधील इम्रान सरकारच्या काळात माहिती आणि आयटी मंत्री असलेले चौधरी फवाद हुसेन यांनी भारताबद्दल एक विचित्र विधान केले आहे. चौधरी फवाद हुसेन यांनी रविवारी (27 एप्रिल 2025) एक्स वर पोस्ट करून भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला, ते म्हणाले की, 'भारतात, विशेषतः हिंदी पट्ट्यात, पाकिस्तानबद्दल भीतीची भावना, अनेकदा पाकिस्तान-भारत सीमेवरील जटिल प्रादेशिक गतिमानतेवर परिणाम करते.' ते पुढे म्हणाले की जम्मू-काश्मीर आणि पंजाब सारखी राज्ये जी पाकिस्तानला लागून आहेत. तिथल्या लोकांचे सीमेपलीकडे (पाकिस्तान) असलेल्या समुदायांशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























