निधी वाटपावरून शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये वाद, तानाजी सावंतांच्या विरोधात शिंदे-फडणवीसांकडे तक्रार
Maharashtra politics : मतदारसंघातील निधी वाटपावरून सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेना आमदारांमध्ये वाद असल्याचं समोर आले आहे.
Maharashtra politics : मतदारसंघातील निधी वाटपावरून सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेना आमदारामध्ये वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि सचिवांकडे तक्रार केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात निधी वाटपात असमतोल झाल्याबाबत त्यांनी तक्रार केली आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात त्यांनी तक्रार केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आलेला सर्वाधिक निधी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या भूम परंडा मतदारसंघात गेला आहे. तर भाजप आमदारांच्या आणि इतर मतदारसंघात काहीच निधी मिळाला नाही. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रधानसचिवांकडे तक्रार केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर भाजपच्या आमदारांची नाराजी असल्याचं समोर आले आहे. लेखी तक्रारीनंतर यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं समजतंय.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एकूण 250 कोटींचा निधी मंजूर झालाय. त्यापैकी बहुतांश निधी तानाजी सावंत यांच्या भूम परांडा मतदार संघासाठी आहे तर इतर मतदारसंघांमध्ये तुटपूंज्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे तक्रारीत म्हटलेय.
कसा झाला निधी वाटप ?
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी यात्रा स्थळांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेचं अनुदान
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी यात्रा स्थळांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेचं अनुदान एकूण 9 कोटी 50 लाख असून त्यापैकी भूम परांडा मतदारसंघासाठी 8 कोटी 60 लाख आणि इतर मतदार संघांसाठी फक्त 90 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच तानाजी सावंत यांच्या मतदारसंघासाठी 90.53 टक्के निधी देण्यात आला आहे. ग्रामीण जिल्हा रस्ते व विकास मजबुतीकरणासाठी एकूण 20 कोटी रुपयांचा निधी आहे, त्यापैकी पूर्ण वीस कोटी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात वळवण्यात आला.
जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामासाठी एकूण चार कोटी सात लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात एक कोटी 45 लाख रुपयाचा निधी तर इतर मतदारसंघांमध्ये 3 कोटी 15 लाख रुपयांचा निधी राखीव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एकूण 250 कोटींचा निधी मंजूर झालाय. त्यापैकी बहुतांश निधी तानाजी सावंत यांच्या भूम परांडा मतदार संघासाठी आहे तर इतर मतदारसंघांमध्ये तुटपुंज्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा :
HSC Exam : आई पेपर लिहायला अन् वडील बाळाला झोका द्यायला; हिंगोलीत परीक्षा केंद्राबाहेरच बांधला बाळासाठी झोका