एक्स्प्लोर

बाळासाहेब ठाकरेंच्या दक्षिण मुंबईतील पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पुन्हा लांबणीवर?

याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकावरुनही वाद झाले होते. आता त्यांचा दक्षिण मुंबईत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुतळाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दक्षिण मुंबईतील पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील रहिवासी संघटनांचा दक्षिण मुंबईतील बाळासाहेबांच्या पुतळ्याला विरोध आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) समोर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटावर उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या या ठिकाणी बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यात येऊ नये, असे पत्र दक्षिण मुंबईतील काही संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. फेडरेशन ऑफ रेसिडेंट ट्रस्ट (फोर्ट) या संघटनेने यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या शिखर संघटनेत ओव्हल कुपरेज रेसिडेंट असोसिएशन (ओसीआरए), नरिमन पॉइंट चर्चगेट सिटीझन असोसिएशन (एनपीसीसीए) आणि ओव्हल ट्रस्टचा समावेश आहे. दक्षिण मुंबईत बाळासाहेबांचा पुतळा का नको? येथे पुतळा उभारल्यास येथील वाहतूक नियमनात अडथळे येतील, असे या संघटनांचे म्हणणे आहे, यासाठी पर्यायी जागा शोधावी. पर्यायी जागा मिळत नसेल तर पुतळ्याच्या उंचीबाबत पुनर्विचार करावा, अशी त्यांची मागणी आहे. या ठिकाणी लालबहादूर शास्त्रींचाही पुतळा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्यापेक्षा मोठा असू नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. पत्रानुसार, दक्षिण मुंबईत जेथे बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार आहे; ते ठिकाण युनेस्को जागतिक वारशांच्या यादीत येते. परिणामी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यासाठी पर्यायी जागा शोधावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. येथूनच गेट वे ऑफ इंडियाकडे मार्ग जात असून, येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या कारणाने येथे पुतळा उभारण्यात येऊ नये, असेही पत्रात नमूद आहे. पुतळ्याची जागा, उंची आणि यामुळे वाहतुकीच्या नियमनावर लक्ष ठेवण्यास अडथळे येतील, असे संघटनेचे म्हणणे आहे. याआधी बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या निर्णयाबाबत काय काय झालं? याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकावरुनही वाद झाले होते. आता त्यांचा दक्षिण मुंबईत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुतळाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याआधी बाळासाहेबांचा पुतळा गेट वे ऑफ इंडियाजवळ रिगल सिनेमासमोरील वाहतूक बेटावर बसवण्यात येणार होता. मात्र, नियोजित जागा अपुरी पडल्यानं पुन्हा पुतळ्याची जागा बदलुन ती नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) समोर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटावर निश्चित करण्यात आली. आता रहिवासी संघटनांच्या विरोधामुळे ही जागा पुन्हा बदलली जाईल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आज नोव्हेंबरचा पहिला दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, वाचा आजचे राशीभविष्य
आज नोव्हेंबरचा पहिला दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, वाचा आजचे राशीभविष्य
भाजपकडून अफवा पसरवण्याचं काम सुरु, रॅलीमुळं व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?  
भाजपकडून अफवा पसरवण्याचं काम सुरु, रॅलीमुळं व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?  
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
10 वी पास महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना, दरमहा 7000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती 
10 वी पास महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना, दरमहा 7000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
Embed widget