(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Oppo Reno 7 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या याचे खास फीचर्स आणि किंमत
Oppo Reno 7 Series Launch: Oppoची ही नवीन सिरीज खास कॅमेरा केंद्रित आहे. यासोबतच यामध्ये अत्याधुनिक व्हर्च्युअल रॅमचे फीचर्सही देण्यात आले आहेत, जे वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरतील.
Oppo Reno7, Reno 7 Pro 5G Features: Oppo Reno 7 आणि Oppo Reno 7 Pro ही ओप्पोची नवीन सिरीज भारतात लॉन्च करण्यात आली आहे. Oppoची ही नवीन सिरीज खास कॅमेरा केंद्रित आहे. यासोबतच यामध्ये अत्याधुनिक व्हर्च्युअल रॅमचे फीचर्सही देण्यात आले आहेत, जे वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरतील. या सोबतच Oppo Watch Free देखील लाँच करण्यात आले.
Oppo Reno7 5G, Reno7 Pro 5Gची किंमत आणि विक्रीची तारीख
Oppo Reno 7 5G ची किंमत 28,999 रुपये आहे आणि हा फोन 17 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. Reno 7 Pro 5G ची किंमत 39,999 रुपये असेल आणि याची विक्री 8 फेब्रुवारीपासून सुरू होईल. Oppoचे हे स्मार्टफोन्सवर ICICI बँक आणि IDFC First Bank कार्ड्सवरून खरेदी केल्यास 10 टक्के सूट देखील मिळेल. हे फोन फ्लिपकार्ट, ओप्पो वेबसाईट आणि ऑफलाईन ओप्पो स्टोअर्सद्वारे विकले जातील. Oppo वॉच फ्रीची किंमत 5,999 रुपये असेल, तर Enco M32 या नेकबँडची किंमत 1,799 रुपये आहे.
Oppo Reno7 5G स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno 7 5G आणि Reno 7 Pro 5G दोन्ही फोन निळा आणि स्टारलाईट ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध आहेत. दोन्ही फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 65W फास्ट चार्जिंगसह 4500 mAh बॅटरी आहे. फोनमध्ये RAM एक्सपेन्शन देखील आहे, ज्यात वापरकर्ते त्यांच्या पसंतीनुसार 3GB किंवा 5GB किंवा 7GB पर्यंत रॅम वाढवू शकतात. दोन्ही फोन Android 11सह Oppo ColorOS 12वर काम करतात.
Oppo Reno 7 5Gमध्ये MediaTek Dimensity 900 5G प्रोसेसर आहे आणि त्यात 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यात 8GB RAM आणि 256GB इंटरनल मेमरी हा एकच पर्याय आहे. या फोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे, तर रिअर कॅमेरा सिस्टममध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाईड-अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स कॅमेरा समाविष्ट आहे.
Reno 7 Pro 5G स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno7 Proमध्ये Dimensity 1200 MAX प्रोसेसर देण्यात आला आहे, जो पूर्वीच्या प्रोसेसरचा अपग्रेडेड प्रकार आहे. हा फोन फक्त 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्येच येतो. यात 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.
Oppo Reno 7 Proच्या कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर, बॅक पॅनल वर 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 8 मेगापिक्सल्सचा सेकंडरी कॅमेरा आहे, जो अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. यात 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्सही आहे. या लेन्सच्या मदतीने उत्तम फोटो क्लिक करण्यास मदत होते. या फोनमध्ये फ्रंटला 32-मेगापिक्सल कॅमेरा आहे. कंपनीने या फोनमध्ये Sony IMX709 सेन्सर वापरला आहे.
हेही वाचा :
- Instagram New Feature : इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आता 3D अवतार, लवकरच येणार नवं फीचर
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
- मारुती सेलेरियो आणि वॅगनआर मध्ये जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या कोणती कार आहे दमदार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha