Nagpur : 'एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियान' ला सुरुवात
'आझादी का अमृत महोत्सव' या निमित्ताने कॅन्सर पिडीत मुलाच्या औषध व इतर खर्चाकरिता 15 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत 'एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियान' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

नागपूरः कॅन्सर पिडीत मुलाच्या औषध व इतर खर्चाकरिता देवता लाईफ फाऊंडेशनच्यावतीने 'एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियान' ला सुरुवात करण्यात आली. 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत अभियान चालणार आहे. या अभियानाचे उद्घाटन नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, रिजनल कॅम्सर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर नागपूरच्यावतीने डॉ. करतार सिंग, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अतुल सबनीस यांच्याहस्ते करण्यात आले.
संस्थेच्यावतीने मागील 7 वर्षांपासून या क्षेत्रात कार्य करण्यात येत आहे. 'आझादी का अमृत महोत्सव' या निमित्ताने कॅन्सर पिडीत मुलाच्या औषध व इतर खर्चाकरिता या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. गरजूंच्या मदतीसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन या महायज्ञात आपले सहकार्य नोंदवावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील 75 चौकातून, शाळा कॉलेज बागिचे दवाखान्यातून जनजागृती करण्यात येईल. उद्घाटनानंतर कॅन्सरग्रस्त असलेले नवीन मुलं दत्तक घेण्यात आले. तसेच संस्थेला सहकार्य करणाऱ्या नामदेवराव नाचनकर व गजानन उमाठे यांचा सत्कार करण्यात आला.
या नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर बावणे होते. त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 15 ऑगस्ट रोजी महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून 75 चौकातून ही रॅली निघेल. तसेच 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 वर्षावरील 75 जेष्ठ नागरिकाचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या अभियानात कॅन्सर पिडीत मुलाच्या आर्थिक नियोजनाकरीता नागपूरकरांनी फक्त एक रुपया देवून या महारैलीला सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले संस्थेचे सचिव सुधीर बाहेती यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता भाग्यश्री चिटणीस यांच्या पसायदानाने झाली सदर कार्यक्रमास संस्थेच्या विश्वस्त निलिमा बावणे, सारिका पेंडसे, प्रतापराव हिराणी, नरेंद्र सतीजा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि दि धरमपेठ महिला संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.























