(Source: ECI/ABP News/ABP Majha)
No Horking Day : मुंबईत 14 जूनला 'नो हाॅर्निंग डे', वाहतूक पोलिसांची खास मोहीम
मुंबई पोलिस येत्या 14 जूनला संपूर्ण शहरात 'नो हाॅर्न प्लीज' (No Horn Please) ही मोहीम राबवणार आहेत. शहरातील वाढतं प्रदूषण लक्षात घएता 14 जूनला 'नो हाॅर्न प्लीज' पाळण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबई पोलिस येत्या 14 जूनला संपूर्ण शहरात 'नो हाॅर्न प्लीज' (No Horn Please) ही मोहीम राबवणार आहेत. वाढत्या ध्वनी प्रदूषणाचा (Noise Pollution) विचार करता ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांद्वारे देण्यात आली आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणाचा अंदाज घेता 14 जूनला वाहतूक पोलिस पाळणार आहेत. बुधवारी संपूर्ण एक दिवस ही अनोखी मोहीम राबवली जाणार आहे. शहरात माणसांची जेवढी गर्दी आहे, त्याहीपेक्षा जास्त गर्दी ही गाड्यांची आहे. यामुळे मुंबईकरांना एक दिवसाकरीता कर्कश आवाजापासून दिलासा मिळणार आहे.
दिवसभरात अनेक लोक कित्येकदा विनाकारण हाॅर्न (Horn) वाजवतात. परिणामी ध्वनी प्रदूषण वाढते. या रोजच्या वाढत्या प्रदूषणाचा त्रास लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच होतो. यामुळे शहरातील महत्वाच्या जंक्शनवर (Junction) वाहतूक पोलिस कडेकोट बंदोबस्त करणार आहेत. यावेळी पोलिस अधिकारी जागोजागी तैनात करून हाॅर्नबाबत विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. गरज असेल त्याच वेळी हाॅर्न वाजवा हा सल्ला प्रत्येकाला देण्यात येणार आहे.
'नो हाॅर्निंग' च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर करण्यात येणार कारवाई
वाहनचालकांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक प्रशासनाद्वारे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच 'नो हाॅर्निंग डे' या मोहीमेच्या वेळी लोकांना मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी लोकांची गर्दी जास्त दिसून येते. अशा वेळी हाॅर्न वाजवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. विनाकारण हाॅर्न वाजवणाऱ्यांना यावेळी पोलिस चौकीत दाखल केले जाणार आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील लोकांना आवाहन केले आहे कि, या मोहीमेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. तसेच ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण कमी करणे हा या मोहीमेचा मुख्य उद्देश असणार आहे. हाॅर्नच्या मोठ्या आवाजाने खूप लोकांना अकाली बहिरेपणा येण्याची शक्यता असते आणि आरोग्यावरही याचा मोठा परिणाम होतो. म्हणून येत्या बुधवारी 'नो हाॅर्निंग डे पाळण्यात येणार आहे.
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी खास मोहीम
मुंबईत वाहनांची मोठी संख्या आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच ध्वनी प्रदुषण होते. शहराला या समस्येपासून मुक्त करण्यासाठीच ही मोहीम राबवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Juhu Accident : जुहू चौपाटीवर पोहायला गेलेल्या आठ मुलांपैकी चार जण बुडाले, चार जणांना वाचवण्यात यश