एक्स्प्लोर
Juhu Accident : जुहू चौपाटीवर पोहायला गेलेल्या आठ मुलांपैकी चार जण बुडाले, चार जणांना वाचवण्यात यश
जुहू चौपाटी परिसरात बचाव पथकाचं सर्च ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत चार मुलांना वाचण्यात यश आलं आहे.
मुंबई: जुहू कोळीवाडा चौपाटी परिसरात आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. वाकोला परिसरामधून पोहायला आलेल्या आठ लहान मुलांपैकी चार मुलं बुडाल्याची माहिती समोर येत आहे.
चार मुलांना लोकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र अजून चार मुले समु्द्रात असल्याची माहिती आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात गेल्या दोन दिवसापासून मोठमोठ्या लाटा उठत असल्याचं दिसून येतंय. याच समुद्राच्या लाटांमध्ये वाकोला परिसरांमधून आलेल्या आठ लहान मुलांपैकी चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे लाईफ गार्ड आणि कोस्टगार्ड घटनास्थळी पोहोचले आहेत. या भागात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement