नितीन गडकरी यांचा दणका, विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर; सल्लागार समितीच्या सदस्यांची तातडीची बैठक
Nagpur News: नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत असल्याचे लक्ष्यात येताच या प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दणक्यानंतर आता विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.
Nagpur News: नागपूर विमानतळ (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत असल्याचे पुढे आले आहे. यामुळे नागपूरातील प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात. परिणामी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नागपूरच्या जनतेची माफी मागण्याची वेळ आली होती. तसेच एक महिन्यात काम पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला निर्देशही दिले होते. किंबहुना काम वेळेत न केल्यास संबंधीत कंपनीला ब्लॅकलिस्ट करणार असल्याचा इशाराही नितीन गडकरी यांनी दिला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दणक्यानंतर आता विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. सोमवारी नितीन गडकरींनी नागपूर विमानतळाच्या धावपट्टीची पाहणी केल्यानंतर धावपट्टीचे रिकार्पेटिंगचे काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच संथगतीने सुरू असलेल्या कामावर चिंता व्यक्त करत सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा इशारा ही दिला होता. यावर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यांनी 28 डिसेंबरला बैठक बोलावली आहे. यात नितीन गडकरी यांच्या सुचनांवर अमलबजावणी कशी करावी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
कामावर लक्ष ठेवायला एक कमिटीची नेमणूक- नितीन गडकरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावरील (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) धावपट्टीच्या सुधार कार्याची एअरपोर्ट ऑथोरिटी आणि मिहानच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. गेल्या अनेक दिवसांपासून विमानतळ धावपट्टीचे काम प्रलंबित आहे. नागपूरमधील उड्डान सेवांवर याचा परिणाम होत असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर धावपट्टीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश या वेळी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, या कामावर लक्ष ठेवायला मी एक कमिटी नेमली आहे. यावेळी मी धावपट्टीची पाहणी केली. हे विमानतळ लवकरंच नविन कंपनीला हस्तांतरित होणार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रनवे रिकार्पेटिंगच्या कामाला वेळ लागला असेही नितीन गडकरी पाहणी वेळी म्हणाले.
तीन किमीच्या रनवेसाठी दीड वर्षे कसे लागतात?- नितीन गडकरी
मुबंई दिल्ली महामार्ग 1370 किमीचा एक लाख कोटींचा रस्ता मी दोन वर्षांत केला आणि तीन किमीच्या रनवेसाठी दीड वर्षे कसे लागतात, हे हास्यास्पद आहे. 2024 च्या मे महिन्यात के जी गुप्ता या कंपनीला काम देण्यात आले. यात रनवे रिकार्पेटिंगचं काम देण्यात आले. मात्र कंत्राटदाराकडे पुरेशी मशिनरी नाही. हे केवळ एक आठवड्याचे काम आहे. रनवे रिकार्पेटिंगच्या कामामुळे विमान कंपन्यांनी शेड्युल बदलले, त्यामुळे विमानात तिकिटाचे दर वाढले आहेत. याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळी ते म्हणाले की त्यांच्यामुळे तिकीटं वाढले. निवडणूकीमुळे वेळ लागल्याचंही त्यांनी सांगीतलं. पण यासाठी केवळ 10 दिवस गेले आहेत.
हे ही वाचा