एक्स्प्लोर

सरकारने आणली मुलांसाठी नवी योजना, चिमुकल्यांचं भवितव्य होणार सुरक्षित; जाणून घ्या काय आहे NPS वात्सल्य योजना?

केंद्र सरकारने लहान मुलांसाठी आता नवी योजना आणली आहे. या योजनेचे नाव एनपीएस वात्सल्य योजना असून मुलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

NPS Vatsalya Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताामन (Nirmala Sitharaman) यांनी काही दिवसांपूर्वी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्प सादरीकरणारम्यान एनपीएस वात्सल्य योजनेची (NPS Vatsalya Scheme) घोषणा करण्यात आली होती. आता याच घोषणेची अंमलबजावणी केली जात आहे. येत्या 18 सप्टेंबर 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन ही योजना चालू करणार आहेत.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी पोर्टल लॉन्च केले जाणार आहे. यासह या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहितीही यावेळी सादर केली जाईल. 

एनपीएस वात्सल्य योजना काय आहे?  

एनपीएस वात्सल्य योजनेअंतर्गत आई वडिलांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्याची संधी मिळणार आहे. पालक आपल्या मुलांसाठी या योजनेच्या खात्यात बचत करून आपल्या मुलांसाठी भविष्यात मोठा आर्थिक निधी तयार करू शकणार आहेत. या योजनेत फ्लेक्झिबल कंट्रीब्यूशन (Flexible Contributions) आणि  गुंतवणुकीची (Investment Option) संधी पालकांना दिली जाणार आहे.  

मुलांचे आर्थिक भवितव्य होणार सुरक्षित 

एनपीएस वात्सल्य योजना ही मुलांचे भविष्य लक्षात घेऊनच तयार करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे भारतीय पेन्शन पद्धतीत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. एनपीएस वात्सल्य ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाअंतर्गत (PFRDA) चालली जाणार आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सर्वांना आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणूनही ही योजना लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. 

देशभरात 75 ठिकाणी कार्यक्रम आयोजित

एनपीएस वात्सल्य योजनेची सुरुवात दिल्लीतून केली जाईल. मात्र या योजनेच्या लोकार्पणासाठी देशभरात साधारण 75 ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग तसेच अन्य माध्यमातून या कार्यक्रमासाठी देशभरातील लोक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमस्थळी योजनेच्या अल्पवयीन सबस्क्रायबर्सना पीआरएएन मेंबरशिप दिली जाणार आहे. 

हेही वाचा :

ई- केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होणार? जाणून घ्या KYC स्टेटस कसं चेक करायचं?

मोठी बातमी! सुकन्या समृद्धी योजनेत मोठे बदल, पॅन, आधार कार्डचा 'हा' नियम सर्वांत महत्त्वाचा

एसआयपी नेमकं काम कसं करते? हजारोंचे लाखो रुपये कसे होतात? जाणून घ्या A टू Z माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा'; देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा; फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
Horoscope Today 25 September 2024 : आजचा बुधवार खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा : 6.30 AM Superfast News : 25 Sept 2024ABP Majha Headlines : 6.30 AM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 11 PM : 24 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Metro 3 : मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा ग्राऊंड रिपोर्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा'; देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा; फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
Horoscope Today 25 September 2024 : आजचा बुधवार खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार खास! हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
Horoscope Today 25 September 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
Shani 2024 : दिवाळीनंतर शनि चालणार सरळ चाल; 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्समध्ये होणार अफाट वाढ
दिवाळीनंतर शनि चालणार सरळ चाल; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्समध्ये होणार वाढ
Embed widget