Nikki Tamboli Evicted From Bigg Boss Marathi Season 5 : रडली, भांडली, आदळाआपट केली! शेवटपर्यंत येऊन निक्की 'बिग बॉस' बाहेर पडली
Nikki Tamboli Evicted From Bigg Boss Marathi Season 5 : निक्की तांबोळी ही बिग बॉसच्या घरातून आता बाहेर पडली आहे.
Nikki Tamboli Evicted From Bigg Boss Marathi Season 5 : 'मीच विजेती होणार' असं पहिल्या दिवसापासून म्हणणारी निक्की (Nikki Tamboli) आता बिग बॉसच्या घराबाहेर (Bigg Boss Marathi New Season) पडली आहे. टॉप 3 स्पर्धकांमधून निक्कीला घराबाहेर जावं लागलंय. त्यामुळे निक्कीच्या घराबाहेर पडल्यामुळे प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण पसरलं असल्याचं चित्र सध्या आहेत. निक्की ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन म्हणजेच टॉप 3 स्पर्धकांमधून बाहेर पडली आहे.
निक्की तांबोळी हे नाव बिग बॉसच्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून गाजत होतं. घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे एकतर निक्कीची चर्चा होती नाहीतर निक्कीमुळे चर्चा होती. तिचं घरातील वागणं, बोलणं यासगळ्यावरच कायम चर्चा होत गेली. प्रेक्षकांमध्येही तिच्याविषयी तीव्र नाराजी होती. असं असतानाही टॉप 3 मध्ये स्थान मिळवण्यात निक्की यशस्वी झाली.
निक्की तांबोळी कोण?
बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतल्यापासून निक्की तांबोळी हे नाव चर्चेत होतं. निक्कीने याआधी बिग बॉस हिंदीमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे निक्कीने आतापर्यंत तीन दाक्षिणात्य आणि दोन हिंदी सिनेमे केले आहेत. निक्कीने 'कंचना 3', 'चिकती गदिलो चित्रकोट्टु' आणि 'थिप्पारा मीसम' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निक्की एका अभिनेत्रीसह मॉडेल देखील आहे. निक्कीने तमिळ, तेलगू चित्रपटांत निक्कीने भूमिका साकारलेल्या आहेत.
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन
28 जुलैपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली होती. एकूण 16 स्पर्धकांनी प्रवेश केला होता. पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोव्हा, घन:श्याम दरवडे, वैभव चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, आर्या जाधव या स्पर्धकांनी 28 जुलै रोजी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. त्यानंतर संग्रामने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. पण यातील एक एक करुन 10 स्पर्धक एलिमिनेट होत गेले.
बिग बॉसचा खेळ 70 दिवसांतच संपला
दरम्यान बिग बॉस हा खेळ 100 दिवसांचा असतो. याआधीही बिग बॉस मराठीचे जे चार सीझन झाले, तो खेळही 100 दिवसांचाच होता. पण यंदा हा खेळ फक्त 70 दिवसच ठेवण्यात आला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनला सुरुवात होत आहे. त्याचमुळे मराठीच्या सीझनने लवकर निरोप घेतला असल्याचं म्हटलं जातंय.
View this post on Instagram