एक्स्प्लोर

शरद पवारांचा असाही एक कार्यकर्ता, 22 वर्षांपासून 310 किमीवरुन शुभेच्छा द्यायला येतात हे आजोबा

आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बारामती आणि मुंबईला पोहोचतात. या कार्यकर्त्यामध्ये एक कार्यकर्ता असा आहे जो गेली 22 वर्ष अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचत आहे. हा कार्यकर्ता म्हणजे निलंगा येथील 64 वर्षीय अब्दुल गणी खडके हे आजोबा.

बारामती : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने त्यांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सत्कार देखील करण्यात आला. आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बारामती आणि मुंबईला पोहोचतात. या कार्यकर्त्यामध्ये एक कार्यकर्ता असा आहे जो गेली 22 वर्ष अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचत आहे. हा कार्यकर्ता म्हणजे निलंगा येथील 64 वर्षीय अब्दुल गणी खडके हे आजोबा. तब्बल 22 वर्षांपासून निलंगा ते काटेवाडी हे 310 किमी अंतर सायकलवरून प्रवास करत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा आगळावेगळा उपक्रम ते राबवत आहेत. एकीकडे निष्ठा संपत चाललेली असताना अब्दुल गणी खडके यांनी आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेली निष्ठा दाखवून देत आहेत. 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तब्बल तीनशे किलोमीटर सायकल प्रवास करत आहेत. तेही सायकलवरून..शरद पवार यांची जन्मभूमी असलेल्या काटेवाडीत येऊन ते शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करतात. शरद पवार यांनी आजपर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जे काम केलंय ते न विसरता येणारं आहे. त्यामुळंच आपण या जाणत्या राजाला शुभेच्छा देण्यासाठी सायकलवरून येत असल्याचे अब्दुल गणी खडके सांगतात. पवार यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा  दुसरीकडे आज मुंबईत शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, माझा जन्मदिवस माझ्या लक्षात रहात नाही परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात राहतो. माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवलं. 1936 साली लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचं शिक्षण व्हावं असा तिचा आग्रह होता याची माहितीही शरद पवार यांनी सभागृहात सांगितली.
शरद पवारांचा असाही एक कार्यकर्ता, 22 वर्षांपासून 310 किमीवरुन शुभेच्छा द्यायला येतात हे आजोबा
सार्वजनिक जीवनात यश मिळतं. संकट येतात. त्यावेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणूस आहे असेही शरद पवार म्हणाले. आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल. शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत 50 हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्यावेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले. शेतकर्‍यांची मुलं सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India EU FTA Trade Deal : भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, मदर ऑफ ऑल डीलची उद्याच घोषणा
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, मदर ऑफ ऑल डीलची उद्याच घोषणा
Kolkata Nazirabad Fire : कोलकाताच्या नाझिराबादमध्ये गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी, अनेकजण जखमी 
कोलकाताच्या नाझिराबादमध्ये गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी
आईची काटकसर अन् पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिलेत; लाडक्या बहि‍णींना एकनाथ शिंदेंची साद, 2100 रुपयांची बात
आईची काटकसर अन् पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिलेत; लाडक्या बहि‍णींना एकनाथ शिंदेंची साद, 2100 रुपयांची बात
Michael Clarke : मायकल क्लार्कचं असिस्टंट सोबत होतं अफेअर, पत्नीनं घटस्फोट घेतला, पोटगी म्हणून द्यावे लागलेले तब्बल 300 कोटी 
मायकल क्लार्कचं अफेअर पत्नीनं पकडलेलं, क्लार्कला घटस्फोटानंतर द्यावी लागलेली 300 कोटींची पोटगी

व्हिडीओ

Zero Hour Republic Day : 77 वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा, देशात आणि राज्यात मोठा उत्सव
Sambhaji Bhide on Sharad Pawar : शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही, संभाजी भिडेंची टीका
Sahar Shaikh Update : मुंब्रा हिरवा करुन टाकू, या वक्तव्याची गणेश नाईकांकडून पाठराखण
Uday Samant on Imtiaz Jalil : भगवा महाराष्ट्र होता, आहे आणि राहणार, सामंतांचे जलीलांना थेट उत्तर
Solapur Daru Raid : सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, मद्रे गावातील बनावट देशी दारूचा कारखाना उद्धवस्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India EU FTA Trade Deal : भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, मदर ऑफ ऑल डीलची उद्याच घोषणा
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, मदर ऑफ ऑल डीलची उद्याच घोषणा
Kolkata Nazirabad Fire : कोलकाताच्या नाझिराबादमध्ये गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी, अनेकजण जखमी 
कोलकाताच्या नाझिराबादमध्ये गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी
आईची काटकसर अन् पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिलेत; लाडक्या बहि‍णींना एकनाथ शिंदेंची साद, 2100 रुपयांची बात
आईची काटकसर अन् पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिलेत; लाडक्या बहि‍णींना एकनाथ शिंदेंची साद, 2100 रुपयांची बात
Michael Clarke : मायकल क्लार्कचं असिस्टंट सोबत होतं अफेअर, पत्नीनं घटस्फोट घेतला, पोटगी म्हणून द्यावे लागलेले तब्बल 300 कोटी 
मायकल क्लार्कचं अफेअर पत्नीनं पकडलेलं, क्लार्कला घटस्फोटानंतर द्यावी लागलेली 300 कोटींची पोटगी
आधी स्मारक जाळलं, पुन्हा तिरंगा फडकला; नक्षल्यांचा गड बिनागुंडात पहिल्यांदाच ध्वजारोहन, पोलीस चौकीही उभारली
आधी स्मारक जाळलं, पुन्हा तिरंगा फडकला; नक्षल्यांचा गड बिनागुंडात पहिल्यांदाच ध्वजारोहन, पोलीस चौकीही उभारली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2026 | सोमवार
T20 World Cup 2026 : पाकिस्तानचं नवं नाटक, आयसीसीची आर्थिक कोंडी करण्याचा प्लॅन, भारताविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार टाकण्याचा डाव
पाकची कारस्थानं सुरुचं, ICC ची आर्थिक कोंडी करण्याचा प्लॅन, भारताविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार टाकण्याचा डाव
गिरीश महाजनांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, माधवी यांना प्रकाश आंबेडकरांचा फोन, समर्थनार्थ घोषणाबाजी
गिरीश महाजनांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, माधवी यांना प्रकाश आंबेडकरांचा फोन, समर्थनार्थ घोषणाबाजी
Embed widget