एक्स्प्लोर

मोठं यश! राज्यात एकही नव्या नक्षलवाद्यांच्या दलममध्ये प्रवेश नाही; नक्षलवाद्यांच्या सरसेनापतीचे धक्कादायक खुलासे

गेल्या पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील एकही स्थानिक तरुणाने नक्षलवाद्यांच्या दलममध्ये प्रवेश घेतलेला नाही. असा गौप्यस्फोट सरसेनापती मानल्या जाणाऱ्या कोला तुमरेटी उर्फ नांगसू उर्फ  गिरधरने केलाय.

Gadchiroli Naxal गडचिरोली : गेल्या पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील एकही स्थानिक तरुणाने नक्षलवाद्यांच्या दलम मध्ये प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे गडचिरोली किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या नक्षलवाद्यांच्या हिंसात्मक कारवाया फक्त परराज्यातील नक्षलवाद्यांच्या जोरावर केल्या जात आहे, आणि हे आम्ही म्हणत नाही. तर हा गौप्यस्फोट केला आहे गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा नेतृत्व करणाऱ्या, त्यांचा सरसेनापती मानल्या जाणाऱ्या "कोला तुमरेटी उर्फ नांगसू उर्फ  गिरधर" ने.

गेले अनेक वर्ष गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या सशस्त्र लढ्याचा नेतृत्व करणाऱ्या गिरधरने  काही दिवसांपूर्वी पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बोलताना नक्षलवाद्यांच्या या टॉप कमांडर गिरधरने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.

गडचिरोली आणि महाराष्ट्रात नक्षलवाद्यांची कंबर अक्षरशः तुटली आहे. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करणे बंद केले आहे. स्थानिक तरुणांना आता बंदुकी पेक्षा विकास प्रकल्प आणि त्याच्यातून निर्माण होणारे रोजगार आकर्षित करत आहे. त्यामुळेच गेल्या पाच  वर्षात आम्ही एकही स्थानिक तरुणाला नक्षल दलम मध्ये रुजू (recruit)करू शकलो नसल्याची कबुलीच गिरधरने दिली आहे. बंदुकीचा मार्ग चुकीचा असून गोरगरिबांचे रक्षण फक्त संविधानच करू शकतो, त्यामुळे संविधानाचा मार्गच योग्य आहे, अशी प्रांजळ कबुली ही नक्षलवाद्यांच्या कधी काळच्या या टॉप कमांडर ने एबीपी माझा शी बोलताना दिली आहे. 

कोण आहे गिरधर?

-पूर्ण नाव - कोला तुमरेटी उर्फ गिरधर..

-गिरधर ने वयाच्या 16 व्या वर्षापासून जीवनाचे तब्बल 28 वर्ष नक्षलवाद्यांसोबत जंगलात काढले. 

-गिरधर गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या सशस्त्र लढ्याचा कमांडर तर होताच, सोबतच तो नक्षलवाद्यांच्या राजकीय व सामाजिक प्रपोगंडा मधील महत्त्वाचा थिंक टॅंकही होता. (म्हणजेच तो जंगलमधील गोरिल्ला वॉर आणि राजकीय प्रपोगंडा दोन्ही गोष्टी हाताळत होता)

-काही आठवड्यांपूर्वी गिरधरने तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.

एबीपी माझाशी बोलताना काय म्हणाला गिरधर? 

* आजवर चुकीच्या मार्गावर होतो. आता योग्य मार्गावर आलो आहे...
* अनेक वर्ष नक्षलवादी म्हणून हिंसा केल्यानंतर लक्षात आले की आता या चळवळीला कुठलाही भवितव्य नाही. 
* गडचिरोलीत नक्षल चळवळ संपुष्टात येत आहे, लोक नक्षलवाद्यांपासून दूर गेले आहे, लोक आता नक्षलवाद्यांना मदत करत नाही...
* पोलीस विविध विकास योजना गडचिरोलीच्या दुर्गम आणि अंतर्गत भागांपर्यंत नेत आहेत.. त्यामुळे लोकांना आता बंदूक ऐवजी विकास हवा आहे..
* गडचिरोलीत सुरुवातीला विकास प्रकल्प, मोठे उद्योग येत असताना आम्ही त्याबद्दलच्या नियोजित अपप्रचाराला बळी पडलो होतो. मात्र जेव्हा मोठ्या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळत आहे हे दिसले, तेव्हा आमचा विरोध मागे पडला..
* नक्षलवादी अनेक निर्दोष आदिवासींना त्यांच्यावर पोलीस खबरी असल्याचा आरोप करून त्यांची हत्या करतात.. हे चूक आहे..
* आताही नक्षलवादाच्या मार्गावर असलेल्या तरुणांनी बंदुकीचा मार्ग योग्य की शांततेचा मार्ग योग्य, याचा विचार करावा..
* आत्मसमर्पणाची संधी मिळाली, तर त्याचा लाभ घ्या. 
* संविधानाचा मार्गच योग्य असून संविधान शिवाय दुसरा मार्ग नाही. 
* काहीही अडचण आली तर संविधानच आपल्याला मार्ग दाखवतो, संविधान शिवाय आपल्याला दुसरी सुरक्षा नाही..

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Embed widget