Gadchiroli Naxal: RSS अन् भाजपच्या विरोधात माओवाद्यांच्या ऐल्गार; सशस्त्र लढ्यात सहभागी होण्याचे पत्रातून आवाहन
Naxal Letter : माओवाद्यांच्या दक्षिण सब जोनल ब्युरोकडून पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आरएसएस (RSS) आणि भाजप विरोधात एका पत्रकातून गंभीर आरोप करण्यात आले आहे.
Gadchiroli Naxal गडचिरोली : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) संदर्भात पराभूत झालेले विरोधक ईव्हीएमवर खापर फोडून ईव्हीएम टेम्परिंगचा आरोप करत असताना, आता माओवाद्यांनीही (नक्षलवादी) महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम टेम्परिंगचा आरोप केला आहे. माओवाद्यांच्या दक्षिण सब जोनल ब्युरोकडून पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या पत्रकात हे आरोप करण्यात आले आहे. आरएसएस (RSS)आणि भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी तरुण, बेरोजगार, शेतकरी, मजूर, लहान व्यापारी, बुद्धिजीवी, महिला अशा वर्गांनी पी एल जी ए (PLGA) म्हणजेच माओवाद्यांच्या पीपल्स लिब्रेशन गोरील्ला आर्मीमध्ये सहभागी व्हावं, असे धक्कादायक आव्हानही करण्यात आलय. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला भाजप आणि महायुतीचा महाविजय माओवाद्यांना चांगलाच झोंबल्याचे दिसून येत आहे.
माओवाद प्रभावित भागात गरीब आदिवासींवर अन्याय
एवढेच नाही तर आपल्या पत्रकाच्या माध्यमातून माओवाद्यांनी देशातील माओवादाने प्रभावीत असलेल्या भागात सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या "ऑपरेशन कगार" विरोधातही जोरदार आगपाखड केली आहे. ऑपरेशन कगारच्या माध्यमातून सुरक्षा दल माओवाद प्रभावित भागात गरीब आदिवासींवर अन्याय करत असल्याचा आरोप या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेत गौतम अदानी यांच्या विरोधात सुरू झालेल्या कायदेशीर कारवाईचा उल्लेख ही माओवाद्यांच्या या पत्रकात असून अमेरिकी कोर्टातून अदानी यांच्या विरोधात अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आल्यानंतरही भारताच्या संसदेत अदानीच्या प्रकरणावर मोदी सरकार कुठलीही चर्चा करायला तयार नाही, असा आरोपही माओवाद्यांनी या पत्रकाचे माध्यमातून केला आहे.
छत्तीसगड सरकारच्या विजन 2047 वर ही मावाद्यांच्या या पत्रकातून हल्लाबोल करण्यात आला आहे. जल जंगल जमीन आणि नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या हवाली करण्यासाठीच हे धोरण राबवण्यात येत असल्याचा आरोप माओवाद्यांच्या या पत्रकातून करण्यात आला आहे.
हे ही वाचा