एक्स्प्लोर

पनवेल रेल्वे स्टेशनबाहेरील रिक्षांची कोंडी लवकरच फुटणार, खासदार बारणेंच्या पुढाकाराने तोडगा

Panvel Railway Station : पनवेल रेल्वे स्टेशनबाहेरचा रिक्षा वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याने  प्रवासी, नागरिक, विशेष करून बहुसंख्येने असलेले रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्टेशनबाहेरील रिक्षांची कोंडी आता लवकरच सुटणार असून त्यासंबंधी शिवसेनेच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे ल्वे स्टेशनच्या आतील भागात रिक्षांना पूर्णतः जो मज्जाव केला होता, त्याऐवजी सिंगल लेनमध्ये रिक्षा टप्प्याटप्प्याने आत येऊ शकतील. त्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय टळणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला.

दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल स्थानकाला भेट देत तिथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. त्याच वेळेस तिथे होणारी वाहतूक कोंडी, रिक्षा चालकांचा प्रश्न या संदर्भातही समस्या जाणून घेतल्या. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दोनच दिवसात बैठक घेऊन या विषयात तोडगा काढण्याचे आदेश दिले. 

यापूर्वीही तेथील रिक्षाचालक व अनेक प्रवासी यांनी शिवसेनेकडे वारंवार या विषयाचा पाठपुरावा केला होता. शहरप्रमुख प्रसाद सोनावणे यांनी अनेकदा भेट देऊन येथील प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे व रेल्वे प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात उपमानगरप्रमुख महेश सावंत, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, रेल्वेचे स्टेशन मास्तर अग्रवाल, सीआरपीएफच्या बाबर, रेल्वे पोलीसचे निरीक्षक पाडवी, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, परिवहन विभागाचे निरीक्षक भाड, काही जागरूक प्रवासी, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी या सर्वांना एकत्रित करून एक यशस्वी बैठक संपन्न झाली त्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले.

1) रेल्वे स्टेशनच्या आतील भागात रिक्षांना पूर्णतः जो मज्जाव केला होता ज्यामुळे प्रवाशांना 200 ते 300 मीटर चालत बाहेर यावं लागत होतं. त्याऐवजी आता सिंगल लेनमध्ये साधारण फक्त पंधरा रिक्षा आत मध्ये उभ्या राहतील. आतील 15 रिक्षा भरून एकाच रांगेत बाहेर पडल्यानंतर स्टेशनच्या बाहेर एका बाजूस पुन्हा सिंगल लेन मध्येच उभ्या असलेल्या उर्वरित रिक्षा 15-15 च्या टप्प्याने आत येतील. 
2) स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उभ्या असलेल्या इतर सर्व रिक्षा या सिंगल लेन पद्धतीने एका बाजूला उभे राहतील.
3) शहरातील प्रमुख ठिकाणांचे दर पत्रक निश्चित करून ते तिथे लावण्यात येईल.
4) रिक्षा चालक शक्यतो कोणतेही भाडे नाकारणार नाहीत. व प्रवाशांनी मीटर टाकण्याचा आग्रह केल्यास तो ही मान्य करतील.
5) परमिट नसलेल्या, लायसन्स नसलेल्या , बॅच नसलेल्या रिक्षा व रिक्षाचालक यांच्यावरती कारवाई होईल व त्या सर्व रिक्षा चालक सहकार्य करतील.
6) रिक्षा प्रवासाचे दर पत्रक व संबंधित अधिकाऱ्यांचे नंबरही तेथे डिस्प्ले करण्यात येतील.
7) अनेकदा अधिकाऱ्यांकडूनही होणारा कारवाईचा अनाठायी अतिरेक ते टाळतील.

सर्वच संबंधित शासकीय अधिकारी अशा पद्धतीने एका प्रश्नावर एकत्रित आल्याने तेथे उपस्थित प्रवासी, नागरिक, विशेष करून बहुसंख्येने असलेले रिक्षाचालक या सर्वांनीच खासदार श्रीरंग बारणे, प्रथमेश सोमण, प्रसाद सोनावणे, महेश सावंत यांसह संपूर्ण शिवसेनेचे एका जटील प्रश्नात हात घालून तो यशस्वीरित्या सोडवण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याबद्दल अभिनंदन केले.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
Nanda Karnataki : ती एक अभिनेत्री! साखरपूडा केला, पण लग्न शेवटपर्यंत झालं नाही, तरीही प्रसिद्ध दिग्दर्शकाची विधवा म्हणून आयुष्यभर जगली
ती एक अभिनेत्री! साखरपूडा केला, पण लग्न शेवटपर्यंत झालं नाही, तरीही प्रसिद्ध दिग्दर्शकाची विधवा म्हणून आयुष्यभर जगली
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
All India Panther Sena : घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik MNS : नाशिकमध्ये संवाद सप्ताह ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्जChandrashekhar Bawankule on Opration Lotus : आम्हाला ऑपरेशन लोटस राबवण्याची गरज नाहीDevendra Fadnavis Meet Nitin Gadkari : फडणवीस दिल्लीत दाखल, गडकरींसोबत चर्चा सुरुParbhani Protest Update : परभणीत आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
Nanda Karnataki : ती एक अभिनेत्री! साखरपूडा केला, पण लग्न शेवटपर्यंत झालं नाही, तरीही प्रसिद्ध दिग्दर्शकाची विधवा म्हणून आयुष्यभर जगली
ती एक अभिनेत्री! साखरपूडा केला, पण लग्न शेवटपर्यंत झालं नाही, तरीही प्रसिद्ध दिग्दर्शकाची विधवा म्हणून आयुष्यभर जगली
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
All India Panther Sena : घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Embed widget