एक्स्प्लोर

Navi Mumbai : महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, बिल्डरवर गोळीबाराची महिन्यातील दुसरी घटना

Firing On Builder : पनवेल परिसरात बांधकाम आणि रियल इस्टेट चा व्यावसाय करणाऱ्या स्नेहल पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत गोळी त्यांच्या पायाला लागली.

Firing On Builder : नवी मुंबई (Navi Mumbai)आणि पनवेलमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. पनवेल (Panvel) परिसरात बांधकाम आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेवर गोळीबार (Firing) करण्यात आला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. स्नेहल पाटील असं बांधकाम व्यावसायिक महिलेचं (Builder) नाव आहे. या घटनेत गोळी त्यांच्या पायाला लागली. त्यांना उपचारासाठी नेरुळमधील (Nerul) अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही घटना मंगळवारी (28 मार्च) रात्री घडली. स्नेहल पाटील या पनवेलवरुन उरणला जाताना रात्रीच्या वेळेस हा गोळाबार करण्यात आला. स्नेहल पाटील आपल्या मावस भावासह घराकडे जात असताना गव्हाण फाटा येथे अज्ञात इसमाने येऊन स्नेहल पाटील यांच्या गाडीवर फायरिंग केलं. यावेळी गोळी स्नेहल पाटील यांच्या पायाला लागली असल्याने त्यांना उपचारासाठी नेरुळ इथल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

व्यावसायिक वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज

दरम्यान हा गोळीबार व्यावसायिक वादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

बिल्डरवरील गोळीबाराची महिन्यातील दुसरी घटना

तर बिल्डरवर गोळीबार करण्याची ही एकाच महिन्यातील दुसरी घटना आहे. याआधी 15 मार्च रोजी नेरुळमध्ये एका बिल्डरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. आरोपींनी बिल्डरवर तीन गोळ्या झाडल्या. सावजीभाई पटेल असं मृत बांधकाम व्यावसायिकाचं नावं होतं. ते आपल्या कारने नेरुळच्या अंबिका दर्शन सोसायटीमध्ये जात असताना दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. नेरळच्या सेक्टर 6 मधील अपना बाजारजवळ दुपारी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकांची स्थापना केली होती. 

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांची हत्या प्रकरणे 

दरम्यान नवी मुंबई शहरातील बांधकाम व्यावसायिकांची हत्या प्रकरणे यापूर्वी देखील चांगलीच गाजली होती. सुमारे पंधरा वर्षापूर्वी वाशी येथे दीपक वालेचा, एन आर संकुल निर्माण करणारे डी. एस राजन यांच्या हत्या झाल्या होत्या. अतुल अग्रवाल यांच्यावर गोळीबार झाला आहे. तर एस के बिल्डर्स या बड्या बिल्डरची हत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या हत्या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती. घणसोली इथे बांधकाम साहित्य पुरवण्याच्या वादात तीन वर्षापूर्वी हत्या झाली होती. घणसोली परिसरातील बडे राजकीय प्रस्थ दिवंगत नगरसेवक संजय पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. गुंड टोळ्या सक्रिय असताना बांधकाम व्यावसायिक खंडणी वसुलीच्या भीतीने त्रस्त होते. भूमी बिल्डरचे विजय गजरा यांना धमकवण्यात आले होते. अशा अनेक घटना गेल्या दोन दशकात घडल्या आहेत.  आता पुन्हा एकदा सावजी पटेल हत्या प्रकरणाने बिल्डरवरील गोळीबाराच्या घटनांची चर्चा सुरु झाली आहे.

Navi Mumbai Firing : नवी मुंबईच्या नेरुळमध्ये सावजीभाई पटेल या बिल्डरवर गोळीबार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget