Navi Mumbai : विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकाला 20 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा; नवी मुंबई जिल्हा न्यायालयाचा निर्णय
Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील एका 44 वर्षीय कोचिंग क्लास शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याच्या गुन्ह्याखाली नवी मुंबई इथल्या जिल्हा न्यायालयाने त्याला दोषी ठरवून त्याला 20 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली.
![Navi Mumbai : विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकाला 20 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा; नवी मुंबई जिल्हा न्यायालयाचा निर्णय Navi Mumbai news coaching class teacher sentenced 20 year jail for raping teenaged student Navi Mumbai : विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकाला 20 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा; नवी मुंबई जिल्हा न्यायालयाचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/be9424d9af06f6d29cbc0c298851d9e21663041356123449_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Navi Mumbai Crime : विद्यार्थिनीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी शिक्षकाला (Teacher) 20 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. 2019-20 मध्ये ही घटना घडली असून बलात्कार पीडित विद्यार्थिनी तेव्हा अल्पवयीन होती. नवी मुंबईतील एका 44 वर्षीय कोचिंग क्लास शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा केला होता. नवी मुंबई इथल्या जिल्हा न्यायालयाने शिक्षकाला दोषी ठरवून त्याला 20 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना पहिल्यांदा 2019 मध्ये घडली होती. पीडित मुलीवर पहिल्यांदा अत्याचार झाले तेव्हा ती बारावीत शिकत होती. तिचं वय त्यावेळी 17 वर्षे होतं. ॲाक्टोबर 2019 मध्ये आरोपी शिक्षक संजय भागचंदानी याने पीडित मुलीला क्लास संपल्यानंतर एकटीला थांबायला सांगितलं. यानंतर आभ्यासासाठी नोट्स देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरी घेऊन गेला. यावेळी तिच्यावर बलात्कार करुन केलेल्या कृत्याचे चित्रीकरणही करुन ठेवलं.
व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार
यानंतर 2020 मध्ये संबंधित मुलीला पुन्हा एकदा आपल्या घरी बोलवून आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. पीडितीने जाण्यास नकार दिल्यानंतर केलेले चित्रीकरण समाजमाध्यमात व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली होती. यामुळे घाबरलेली विद्यार्थिनी दोन वेळा त्याच्या हवसची शिकार झाली.
शिक्षा अशी असावी की ती प्रतिबंधक सिद्ध व्हावी : न्यायाधीश
अखेर या प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने सर्व घडलेला प्रसंग आपल्या पालकांना सांगितला. यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक संजय भागचंदानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नवी मुंबई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होती. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश्वरी बी पटवारी यांनी आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. गुन्ह्याची तीव्रता आणि त्याचा समाजाच्या मनोधैर्यावर होणारा परिणाम यामुळे त्याला कठोरपणे सामोरं जावं लागेल. शिक्षा अशी असावी की ती प्रतिबंधक सिद्ध व्हावी, असं म्हणत न्यायाधीशांनी आरोपी शिक्षकाला 20 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)