Nashik News : सुरगाणा बलात्कार प्रकरणी आरोपींना 20 वर्ष कारावासाची शिक्षा, जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निकाल
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (surgana Taluka) तालुक्यात मुलीवर बलात्कार (Rape Case) करणाऱ्या दोघांना न्यायालयाने (Nashik District Court) 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (surgana Taluka) तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे दोन वर्षांपूर्वी अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Rape Case) करणाऱ्या दोघांना नराधमांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nashik District Court) 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात ही घटना घडली होती. यासंदर्भात जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी ऍड. दिपशिखा भिडे यांनी युक्तिवाद करत प्रकरण न्यायालयामोर मांडले. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश डीडी देशमुख यांनी आरोपी हरिश्चंद्र नथू गायकवाड, विलास पुंडलिक चौधरी यांना 20 वर्षाचा करावास, तेरा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात 24 जून 2020 रोजी सायंकाळी एका गावात अवघ्या 14 वर्षे शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सुरगाणा पोलिसांनी सखोल तपास करीत मुलीचा शोध घेतला होता. तब्बल सहा ते सात दिवस या मुलीचा शोध घेतला होता. पोलिसांचा तपास सुरू असताना गावाशेजारील दोन तरुणांचा यात सहभागी असल्याचे समोर आले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यात गायकवाड आणि चौधरी या दोघांनी मुलीचे अपहरण केल्याचे समोर आले. तसेच दोघांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील गावांमध्ये फिरून चार जुलैपर्यंत वेळोवेळी बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दरम्यान पीडित मुलीच्या पालकांनी पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या दोघा संशयितांविरुद्ध बलात्कार व बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत पोस्को गुन्हा दाखल केला होता. चौधरी आणि त्याच्या दुचाकीचा अपहरणासाठी वापर केला होता. यानंतर सखोल चौकशीअंती या दोघांना पोलिसांनी 06 जुलै 2020 अटक केली.
सात साक्षीदारांकडून तपासणी पोलिसांनी घटनेचा उलगडा केल्यानंतर न्यायालयाने त्यावेळी त्यांना आठवडाभराची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत सर्वांनी करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अंतिम सुनावणी सरकारी पक्षातर्फे एडवोकेट दीपशिखा भिडे यांनी व्यक्तिवाद केला. त्यांनी यावेळी साथ साथीदार तपासणी त्यात परिस्थितीजन्य पुरावे साक्षाच्या आधारे दोघांविरोधात गुन्हा सिद्ध झाला.