Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, लवकरच प्रवासी सेवा सुरु होणार
Narendra Modi Navi Mumbai Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं आहे.

नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पार पडलं आहे. नरेंद्र मोदी यांचं विमान नवी मुंबई विमानतळावर दाखल झालं, त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींनी केलं.
Navi Mumbai International Air Port : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यांचं उद्घाटन होणार आहे. या विमानतळाची उभारणी चार टप्प्यात होणार आहे. या विमानतळावरुन प्रवासी वाहतूक आणि कार्गो वाहतुकीसाठी दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करण्यापूर्वी विमानतळाच्या कामासंदर्भातील माहिती जाणून घेतली. मोदींनी आज टर्मिनल 1 आणि रनवे 1 चं काम पूर्ण झालंय त्याचं उद्घाटन मोदी यांनी केलं. पुढच्या टप्प्यात विमानतळाचं काम कसं होणार हे जाणून घेतली. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई जवळील दुसरं विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळ ओळखलं जाईल.
नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनलची उभारणी होणार आहे. पहिल्या टर्मिनलच्या उद्घाटनाला 7 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी अदानी समुह आणि सिडको यांच्याकडून संयुक्तपणे उभारलं जात आहे. अदानी समुहाकडे या विमानतळाची 74 टक्के मालकी आहे. तर, सिडकोकडे 26 टक्के मालकी आहे. अदानी समुहानं 2021 नं विमानतळ निर्माणामध्ये प्रवेश केला. पुढचा टप्पा दोन्ही संस्थांमार्फत होणार आहे. 2018 ला भूमिपूजन झालं त्यानंतर जमीन अधिग्रहण करुन विमानतळ उभारणं मोठं आव्हान होतं. ते काम पूर्ण झालं आहे. टर्मिनल 1 पूर्ण झाल्यानंतर आता डिसेंबर महिन्यात प्रवासी या विमानतळावरुन प्रवास करु शकतात.
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांच्या नावाची घोषणा होणार?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आशियातील सर्वात मोठं विमानतळ म्हणून याकडे पाहिलं जातंय. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे देण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात घोषणा करतात याकडे लक्ष लागलं आहे.
मेट्रो 3 च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन आणि मेट्रो वनचं उद्घाटन
मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे स्टेशन वरळी नाका ते कफ परेड या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलं. याशिवाय मुंबईतील सर्व मेट्रोंमध्ये चालणाऱ्या मेट्रो वन एपचं लाँचिंग देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.



















