एक्स्प्लोर

मनोज जरांगेंच्या यात्रेदरम्यान नवी मुंबईत वाहनांवर रोख; 26 जानेवारी रात्री 11 पर्यंत अवजड वाहनांना बंदी

मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईत दाखल होईल तेव्ह मनोज जरांगे यांच्यासोबतच्या मराठा आंदोलकांची संख्या ही काही लाखात जाईल, असा अंदाज आहे.

मुंबई :  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  मागणीसाठी मनोज जरांगेंची (Manoj Jarange)  पदयात्रा 25 जानेवारी रोजी नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत आहे. त्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय वाहनं उभी करण्यास तसंच शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. मात्र ही अधिसूचना अत्यावश्यक सेवेला लागू नसेल. 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे वादळ जरांगे पाटलांसह मुंबईच्या दिशेने सरकते आहे. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे. आरक्षणासाठी गोळ्या झेलायलाही तयार आहे असा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे.  समाजासाठी थोडा त्रास सहन करावा, सर्व जाती धर्मातील मुंबईच्या लोकांना हात जोडून अवाहन आहे. शांततेत आमरण उपोषण करणारच, समाजासाठी मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही. मी मरायला सुद्धा भीत नाही, असेही जरांगे म्हणाले.  

मोर्चाचा आजचा पाचवा दिवस

 मराठा आरक्षणाच्या मागणीसह ओबीसी प्रमाणपत्र आणि इतर मागण्या घेवून मनोज जरांगेंनी मुंबईकडे कूच केलीये. या मोर्चात शेकडोच्या संख्येने मराठा बांधवही सहभागी झाले.  जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा बीडवरुन, अहमदनगरमार्गे पुण्यात दाखल झाले. या मोर्चाचा आजचा पाचवा दिवस आहे. हा मोर्चा आता मुंबईपासून अवघ्या काही किलो मीटरवर आहे. 

25 जानेवारीला मोर्चा नवी मुंबईत धडकणार

मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढाईसाठी मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. त्यांचा मोर्चा मुंबईत दाखल होईल तेव्ह मनोज जरांगे यांच्यासोबतच्या मराठा आंदोलकांची संख्या ही काही लाखात जाईल, असा अंदाज आहे. गुरुवार 25 जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. त्यावेळी मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची सोय ही नवी मुंबईत करण्यात आली आहे. नवी मुंबईतली मैदानं, सामाजिक सभागृहं, शाळा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी नवी मुंबई महापालिका, सिडको आणि पोलीस प्रशासनाकडून सहाय्य मिळावं असं आवाहन मराठा समन्वयकांकडून करण्यात आलं आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध, गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाचे थेट निर्देश, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget