एक्स्प्लोर

Raj Thackeray: क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार, राज ठाकरेंचा MCA ला शब्द; 20 वर्षानंतर प्रत्यक्ष भेटले मिलिंद नार्वेकर

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांसोबत आमदार मिलिंद नार्वेकर हेदेखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावर पोहोचले होते.

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईला (Mumbai) क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, याच क्रिकेट पंढरीतील एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत अजिंक्य देसाई बनविरोध अध्यक्ष बनले. तर, उपाध्यक्ष, सचिव आणि इतर पदांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सर्व विजयी उमेदवारांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर, क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राजकारण नको म्हणत शरद पवारांनीही या निवडणुकीसाठी महत्त्वाचं आवाहन केलं होतं. त्यामुळे, विजयी उमेदवार सध्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आभार मानत आहेत. अजिंक्य नाईक यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर हेही राजभेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावर आले होते.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांसोबत आमदार मिलिंद नार्वेकर हेदेखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावर पोहोचले होते. विशेष म्हणजे, मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच म्हणजे 20 वर्षानंतर मिलिंद नार्वेकर हे राज ठाकरेंना प्रत्यक्ष भेटले आहेत. या भेटीत मिलिंद नार्वेकरांनी राज ठाकरे आणि क्रिकेट संदर्भात काही जुन्या आठवणींना उजाळा दिला असल्याची माहिती आहे. दरम्यान, यावेळी, राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत क्रिकेटच्या मदतीसाठी त्यांना आश्वासनही दिले. क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.राजकारण बाजूला सारुन एमसीए निवडणुकीत उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांचे अजिंक्य नाईक यांनी यावेळी आभार मानले. 

जितेंद्र आव्हाड एमसीएचे उपाध्यक्ष

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत जिंतेंद्र आव्हाडांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केला. तर, सचिव पदावर उन्मेष खानविलकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी शाह आलम शेख यांचा पराभव केला. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली असून त्यांनी गौरव पय्याडे यांचा पराभव केला. एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची या आधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निकाल -

उपाध्यक्ष - जितेंद्र आव्हाड 203 विजयी वि. नवीन शेट्टी 155

सचिव - उन्मेष खानविलकर 227 विजयी वि. शाह आलम शेख 129

संयुक्त सचिव - निलेश भोसले 228 विजयी वि. गौरव पय्याडे 128

खजिनदार - अरमान मलिक 237 विजयी वि. सुरेंद्र शेवाळे 119

मुंबई टी20 गव्हर्निंग कौन्सिल मेंबर

भरत किणी 184 विजयी वि. किशोर जैन

MCA Election Final Result : ॲपेक्स कौन्सिल (नऊ विजयी उमेदवार आणि मतं)

कदम विघ्नेश- 242

नदीम मेमन- 198

मिलिंद नार्वेकर- 242

भूषण पाटील- 208

विकास रेपाळे- 185

सूरज समत- 246

सावंत नील- 178

संदीप विचारे- 247

प्रमोद यादव- 186

हेही वाचा

Video: अशोक सराफांसमोरच अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या मी कट्टर बीजेपी; आमदार संजय केळकर म्हणाले...

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget